शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

दाऊदचा भाऊ इकबाल कासकरच्या प्रकृतीमध्ये बिघाड; जे. जे. रुग्णालयात दाखल

By जितेंद्र कालेकर | Published: August 21, 2022 7:15 PM

छातीत दुखत असल्याची तक्रार: पाच वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती कारागृहात

ठाणे: व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी गेल्या पाच वर्षापासून ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये असलेला अंडरवल्र्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याला प्रकृती बिघडल्याने शनिवारी मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तिथे त्याच्या वेगवेगळया वैद्यकीय तपासण्या केल्याची माहिती सूत्रंनी दिली.

सोने चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी तसेच बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून करोडो रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी इकबाल याला पाच वर्षापूर्वी ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती. त्याच्यावर मोक्कांतर्गतही कारवाई केली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून इकबाल कासकर हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहे. त्याला २० ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. तसेच छातीतही दुखू लागल्याची त्याने कारागृह प्रशासनाकडे तक्रार केली. याची गांभीर्याने दखल घेत कारागृह प्रशासनाने त्याला तातडीने मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी इसीजीसह अन्यही तपासण्या डॉक्टरांनी केल्याची माहिती सूत्रंनी दिली. त्याच्यावरील अन्यही काही वैद्यकीय चाचण्या करणार असल्याने त्याला रुग्णालयातच दाखल केल्याची माहिती ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी दिली.

टॅग्स :Iqbal Kaskarइक्बाल कासकर