शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीला काळीमा! 10 वर्षीय मुलीवर 7 जणांकडून बलात्कार; मोबाईलवर Video पाहून वडिलांना मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 12:08 IST

Crime News : 10 वर्षीय मुलीवर शाळेतील परिसरात 7 जणांकडून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना या सातत्याने घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना हरियाणामध्ये घडली आहे. एका 10 वर्षीय मुलीवर शाळेतील परिसरात 7 जणांकडून बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे यातील 6 मुले ही अल्पवयीन आहेत. आरोपींनी या घटनेचा व्हिडीओ बनवून तो काहींच्या व्हॉट्सॲपवर पाठवला होता. व्हायरल झालेला तो व्हिडीओ मुलीच्या वडिलांना देखील मिळाला. हे पाहून त्यांना खूप मोठा धक्काच बसला आणि त्यानंतर हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. 

व्हिडीओ पाहिल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणामधील रेवाडीच्या रामपुरा पोलीस ठाणे परिसरात ही घटना घ़डली आहे. 24 मे रोजी मुलगी घराजवळच असलेल्या शाळेच्या मैदानात खेळत होती. त्या वेळी आजूबाजूला असलेल्या या मुलांनी तिला पकडून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे हे कृत्य करणारी मुले ही 8 ते 14 वर्षे वयोगटातील असून यातील एकजण अठरा वर्षांचा आहे. तसेच त्यांनी या घटनेचा व्हिडीओ देखील शूट केला होता.

आरोपींनी शूट केलेला व्हिडीओ काही जणांना पाठवला होता. तिथूनच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हॉट्सॲपवर व्हायरल झालेला व्हि़डीओ पीडितेच्या वडिलांनाही दिसला आणि ते हादरलेच. त्यांनी याप्रकरणी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणीचं अपहरण करुन सामूहिक बलात्कार; घटनेने खळबळ

आपल्या मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये ही घटना समोर आली आहे. आपल्या मित्रांसोबत स्कूटीवर फिरायला गेलेल्या तरुणीचं काही तरुणांनी अपहरण केलं. आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच पीडित तरुणीला आणि तिच्या मित्रांना बेदम मारहाण करण्यात आली. तरुणी मित्रांसोबत फिरायला गेली असताना काही तरुणांनी त्यांना अडवलं आणि पीडित तरुणीला एका अज्ञातस्थळी नेलं. आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी इज्जतनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मे रोजी त्याची बहीण फिरण्यासाठी घराबाहेर पडली होती. तिचे दोन मित्र अर्णव आणि सागर घराबाहेर आले. त्यावेळी ती त्यांच्यासोबत बाहेर फिरायला गेली. इज्जतनगर परिसरातील भगवानपूर धिमरी येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने पीडित मुलगी आणि तिच्या मित्रांना थांबवले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndiaभारतPoliceपोलिस