शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराला भेटण्यास मनाई करणाऱ्या आईचा मुलीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 18:13 IST

Murder : संतप्त झालेल्या महिलेने मुलीला चोप देऊन मुलाला भेटण्यास विरोध केला. याप्रकाराचा मुलीला राग येऊन प्रियकराच्या मदतीने आईचा काटा काढण्यास ठरविले.

ठळक मुद्देदबा घालून बसलेल्या प्रियकर दिलजीत यादव याने घरात धाव घेऊन महिलेच्या गळ्यावर व इतर ठिकाणी चाकूने वार केले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहर पूर्वेतील २६ सेक्शन येथे राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेची हत्या तिच्याच अल्पवयीन मुलीने प्रियकराच्या मदतीने शनिवारी मध्यरात्री केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. विठ्ठलवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून प्रियकराला अटक केली. अल्पवयीन मुलीची रवानगी बालसुधारगृहमध्ये रवानगी केली आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-४, २६ सेक्शन परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय महिला १५ वर्षाच्या मुलीसह राहत होती. शनिवारी मध्यरात्री महिलेचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली. विठ्ठलवाडी पोलिसांनी तपासाची चक्र जलद फिरवीत त्याच रात्री २० वर्षाच्या दिलजीत यादव नावाच्या तरुणाला अटक केली. पोलिसांनी दिलजीत यादव याला बोलते केल्यावर, तो महिलेच्या अल्पवयीन मुलीचा प्रियकर निघाला. काही दिवसांपूर्वी दिलजीत यादव याने मुलीला फिरायला घेऊन जाऊन, अश्लील व्हिडीओ काढला. सदर व्हिडीओ महिलेच्या हाती लागल्यावर, संतप्त झालेल्या महिलेने मुलीला चोप देऊन मुलाला भेटण्यास विरोध केला. याप्रकाराचा मुलीला राग येऊन प्रियकराच्या मदतीने आईचा काटा काढण्यास ठरविले.

 शनिवारी रात्री आई झोपली असताना, मुलीने आईच्या डोक्यावर विटेचा जोरदार प्रहार केला. त्यावेळी दबा घालून बसलेल्या प्रियकर दिलजीत यादव याने घरात धाव घेऊन महिलेच्या गळ्यावर व इतर ठिकाणी चाकूने वार केले. या मारहाणीत व हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. विठ्ठलवाडी पोलिसांनी खून झालेल्या महिलेच्या अल्पवयीन मुलीला बोलते केले असता, तिने खुनाची कबुली दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हेयालाल थोरात यांनी पत्रकारांना दिली. पोलिसांनी अल्पवयीन मुलीसह तिचा प्रियकर दिलजीत यादव यांना अटक केली. न्यायालयाने यादव याला २७ मार्च पर्यंत पोलीस कस्टडी दिली असून मुलगी अल्पवयीन असल्याने, तिची रवानगी बाल सुधाहरगृह मध्ये करण्यात आली. याप्रकाराने परिसरात खळबळ उडाली होती. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसArrestअटक