शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या पुरुषाच्या प्रेमात वेडी झाली सून; सासूने टोकले म्हणून भरदिवसा संपवले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 11:13 IST

आपल्या अनैतिक संबंधांच्या मार्गात अडथळा ठरत असलेल्या ६९ वर्षीय सासूची सुनेनेच प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केली.

नवाबांच्या शहरात म्हणजेच लखनऊमध्ये नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या अनैतिक संबंधांच्या मार्गात अडथळा ठरत असलेल्या ६९ वर्षीय सासूची सुनेनेच प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केली. लखनऊच्या निशातगंज परिसरात शनिवारी भरदिवसा ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, मृत निर्मला देवी या सचिवालयातून निवृत्त झाल्या होत्या. त्यांचा राहत्या घरात हात-पाय बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मुलाने उघडले दार अन् पायाखालची जमीन सरकली!

निशातगंज गल्ली क्रमांक ३ मध्ये निर्मला देवी आपल्या मुलाचा परिवार, सून रंजना आणि नातवंडांसह राहत होत्या. शनिवारी दुपारी ४ च्या सुमारास त्यांचा नातू आदित्य कामावरून घरी परतला. घराचा दरवाजा उघडा नसल्याने त्याने कसाबसा आत प्रवेश केला. समोरचे दृश्य पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्याची आजी निर्मला देवी जमिनीवर मृतावस्थेत पडल्या होत्या. त्यांचे हात-पाय दोरीने बांधलेले होते आणि गळ्यावर आवळल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या.

सुनेचे लफडे अन् सासूचा जीव गेला!

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सुरुवातीलाच सून रंजनाचे वागणे पोलिसांना संशयास्पद वाटले. सखोल चौकशीत समोर आले की, रंजनाचे एका बाहेरील व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. सासू निर्मला देवी यांना या प्रकाराची कुणकुण लागली होती आणि त्या वारंवार रंजनाला टोकून या नात्याचा विरोध करत होत्या. आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या सासूचा काटा काढण्यासाठी रंजनाने प्रियकरासोबत मिळून हा क्रूर कट रचला.

घरात कोणी नसताना साधली संधी

घटनेच्या वेळी निर्मला देवी यांचा मुलगा त्रिदेश ड्युटीवर होता. घरात केवळ रंजना आणि तिची धाकटी मुलगी होती, तर मोठी मुलगी आजोळी उन्नावला गेली होती. याच संधीचा फायदा घेत रंजनाने आपल्या प्रियकराला बोलावून घेतले आणि निर्मला देवींचा गळा आवळून त्यांना संपवले.

पोलीस कारवाई आणि पुढील तपास

लखनऊ पोलिसांनी मुख्य आरोपी सून रंजनाला ताब्यात घेतले असून तिची कसून चौकशी केली जात आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून ठसे आणि इतर पुरावे गोळा केले आहेत. रंजनाचा फरार प्रियकर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही, त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापेमारी सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Daughter-in-law Kills Mother-in-Law Over Affair; Lucknow Shaken

Web Summary : In Lucknow, a daughter-in-law and her lover murdered her mother-in-law for objecting to their affair. The son found his mother dead, bound and strangled. The daughter-in-law has been arrested, and a search is on for the lover.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू