शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video: एक चपाती जास्त खाल्ली म्हणून सुनेने सासुला केली मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 13:16 IST

एका सुनेने सासुला एक पोळी जास्त खाल्ली म्हणून मारहाण केली. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी सून मनिषा, तिची आई आणि भावाला अटक केली आहे.

हरयाणातील (Haryana News) सोनीपतमध्ये सासु सुनेच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका सुनेने सासुला एक पोळी जास्त खाल्ली म्हणून मारहाण केली. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी सून मनिषा, तिची आई आणि भावाला अटक केली आहे.

ही घटना सोनीपत गावातील सांदल खुर्द येथील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सासू इशवंतीला तिची सून घराच्या बाहेर घेऊन जाते आणि तिला जबदरस्तीने काहीतरी विचारताना दिसत आहे. त्यानंतर सून सासूला मारहाण करताना दिसत आहे.

हा प्रकार नातवाने दिलेल्या चपातीवरुन झाला. विधवा इशवंती (७५) हिने सोनीप पोलिसांकडे मारहाणीबाबत तक्रार केली होती. यात तिने मुलगा मुकेशची पत्नी मनिषा ही छळ करीत असल्याचं सांगितलं. सून सकाळ-सायंकाळी दोन चपात्या देते. सूनेने पाच दिवसांपूर्वी दिलेल्या चपत्या खाल्ल्या होत्या. यानंतर नातू आणखी एक पोळी घेऊन आला. त्याने आग्रह केला म्हणून सासूने चपाती खाल्ली. ही बाब सूनेला कळताच ती सासूसोबत भांडू लागली. आणि तिला मारहाण केली.

सून मनिषाने पती मुकेश आणि अन्य सदस्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. ती माहेरीच राहते. काही दिवसांपूर्वी ती सासरी आली होती. तर दुसरीकडे सासू इशवंतीने सुनेवर मारहाणीचा आरोप केला आहे. मुकेशने सांगितलं की, तो आणि त्याचा भाऊ आपल्या वृद्ध आईसोबत राहतात. ते स्वयंपाकही वेगळा करतात. मात्र तरीही पत्नीने वृद्ध आई आणि अन्य जणांचं जगणं अवघड केलं आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाHaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारी