मुलगी ठरली वडिलांच्या वासनेची शिकार; पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 01:09 IST2018-07-30T01:08:02+5:302018-07-30T01:09:33+5:30
गेल्या ३ महिन्यांपासून वडिलांकडूनच १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार सुरू असल्याची धक्कादायक घटना भायखळा येथे उघडकीस आली. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी ५० वर्षीय वडिलांविरुद्ध पॉक्सो, लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

मुलगी ठरली वडिलांच्या वासनेची शिकार; पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
मुंबई : गेल्या ३ महिन्यांपासून वडिलांकडूनच १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार सुरू असल्याची धक्कादायक घटना भायखळा येथे उघडकीस आली. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी ५० वर्षीय वडिलांविरुद्ध पॉक्सो, लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
भायखळा परिसरात १६ वर्षीय मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. पीडितेचे शालेय शिक्षण सुरू आहे. तिचे वडील कडीया काम करतात. घरात एकटी असताना वडिलांची तिच्यावर वाईट नजर पडली. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवेठार मारण्याची धमकी दिली. तिच्या भीतीचा फायदा घेत, गेल्या ३ महिन्यांपासून वडिलांकडूनच तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू होते.
वडिलांचे अत्याचार वाढू लागले. तिने याबाबत नातेवाइकांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातूनही काहीच हालचाली होत नसल्याने, अखेर मुलीने थेट आग्रीपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
मुलीच्या तक्रारीचे गांभीर्य
लक्षात घेत, आग्रीपाडा पोलिसांनी वडिलांविरुद्ध पॉक्सो, लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा
दाखल केला आहे. या गुन्ह्यांत वडिलांना अटक केली आहे. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती आग्रीपाडा पोलिसांनी दिली.