शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

दत्ता पडसलगीकर यांना आणखी ३ महिन्यांची मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 21:09 IST

दुसऱ्यांदा मुदतवाढ; वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे सूर 

ठळक मुद्दे दत्ता पडसलगीकर यांना आणखी तीन महिने मुदतवाढ देण्याचे जवळपास निश्चित झालेअशा पद्धतीने गेल्या कित्येक वर्षानंतर पहिल्यादाच ‘डीजीपी’ पदासाठी मुदतवाढ मिळत आहेपडसलगीकर यांच्या मुदतवाढीमुळे जेष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे

जमीर काझीमुंबई - राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना आणखी तीन महिने मुदतवाढ देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला असून उद्या त्याबाबतचे आदेश जारी होईल, असे गृह विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. पडसलगीकर यांना निवृत्तीनंतर दोन टप्यात सहा महिने मुदतवाढ मिळणार आहे. अशा पद्धतीने गेल्या कित्येक वर्षानंतर पहिल्यादाच ‘डीजीपी’ पदासाठी मुदतवाढ मिळत आहे.गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत केवळ एस.एस.विर्क आणि अजित पारसनीस यांनाच प्रत्येकी तीन महिन्याची मुदतवाढ मिळाली होती. दरम्यान, पडसलगीकर यांच्या मुदतवाढीमुळे जेष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांच्या बढतीला विलंब लागत असल्याचा त्यांच्यातून आक्षेप व्यक्त होत आहे. त्याशिवाय मुंबईचे आयुक्तपद आणि डीजी दर्जाच्या अन्य नियुक्त्यांवर परिणाम होणार आहे.दत्ता पडसलगीकर हे १९८२च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून गेल्या एक जुलैपासून राज्याच्या पोलीस प्रमुखपदाची सूत्रे सांभाळीत आहेत. त्यापूर्वी जवळपास सव्वा दोन वर्षे मुंबईच्या आयुक्तपदी आणि त्यापूर्वी केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. निवृत्तीच्या वयामुळे ‘डीजीपी’पदावर केवळ दोन महिन्याचा अवधी मिळत असल्याने राज्य सरकारकडून त्यांना ३१ आॅगस्टला पहिल्यादा तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. त्याची मुदत शुक्रवारी संपत असून त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

कोण आहेत डीजीपी पदाच्या रेसमध्ये?पडसलगीकर यांच्यानंतर मुंबईचे आयुक्त सुबोध जायसवाल, संजय पांडे (होमगार्ड), संजय बर्वे (एसीबी), बिपीन बिहारी (पोलीस गृहनिर्माण), सुरेंद्र पांडे (कारागृह), डी.कनकरत्नम (सुरक्षा महामंडळ) व हेमंत नागराळे (विधी व तंत्रज्ञ) हे महासंचालक सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या मुदतवाढीमुळे या सर्वांच्या पोस्टींगवर तसेच अप्पर महासंचालक दर्जाची बढती लांबली गेली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या विश्वासातील व प्रामाणिक अधिकारी म्हणून प्रतिमा असल्याने त्यांना मुदतवाढ देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दत्ता पडसलगीकर यांची प्रतिमा अत्यंत प्रामाणिक व मितभाषी अधिकारी अशी आहे.  त्यांच्याबद्दल खात्यामध्ये आदर आहे. मात्र त्यांना मुदतवाढ मिळाल्याने उपायुक्तापासून डीजीपर्यंतच्या पदावरील अधिकाऱ्यांच्या प्रमोशन व बदलीवर परिणाम होतो, हा अप्रत्यक्ष अन्याय असल्याची भावना आयपीएस अधिकाऱ्यांतून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस