शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

डेटा विक्री प्रकरण : ‘त्या’ निष्क्रिय बँक खात्यात तब्बल १०० कोटी पडून, अनघा मोडक, राजेश शर्मा, यांना २० मार्चपर्यंत कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 06:53 IST

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अनघा अनिल मोडक तसेच राजेश शर्मा, परमजित संधू (दोघेही रा. औरंगाबाद) या तिघांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. अधिक तपासासाठी त्यांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली.

पुणे : बँकेतील निष्क्रिय (डॉरमंट) खात्यांचा गोपनीय डेटा मिळवून त्यांची विक्री करून त्याद्वारे कोट्यवधी रुपये कमविण्याच्या कटाचे आणखी काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. पाच खात्यांपैकी एका निष्क्रिय खात्यात तब्बल १०० कोटी रुपये २०१९ पासून पडून असल्याची माहिती समोर आली आहे. अन्य चार खाती ही कॉर्पोरेट असून, त्यात सध्या व्यवहार होत आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अनघा अनिल मोडक तसेच राजेश शर्मा, परमजित संधू (दोघेही रा. औरंगाबाद) या तिघांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. अधिक तपासासाठी त्यांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली.  या प्रकरणात आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्या सर्वांची २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर आहे.गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकांनी औरंगाबाद, लातूर, वापी, हैदराबाद तसेच पुणे अशा विविध ठिकाणी आरोपींच्या घरी सर्च ऑपरेशन राबविले. त्याचबरोबर हैदराबाद आणि वापी येथील संशयित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, अनघा मोडकने या गुन्ह्यातील सर्व आरोपींना एकत्र बोलविल्याची आरोपींकडे केलेल्या चौकशीत माहिती मिळाली. अनघा ही डेटा विक्रीसाठी मिळविणे व संबंधितांपर्यंत पोहोचविणे, असे दलालीचे काम करीत असल्याने तिला सर्वांची माहिती आहे. त्यासाठी तिची पोलीस कोठडी आवश्यक आहे. राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू यांनी मिळून डेटा विकत घेण्याकरिता कोणाकडून पैसे घेतले तसेच त्यांना मिळणारा डेटा ते कोणाला पुढे सुपूर्त करणार होते, याबाबतचा तपास करायचा आहे. ‘डॉरमंट’ खात्याचा गोपनीय डेटा आरोपींना कोणी दिला किंवा हा डेटा आरोपींनी कसा मिळविला याचा शोध घेणे आवश्यक आहे. सर्व आरोपींकडे एकत्रित तसेच स्वतंत्रपणे तपास करायचा आहे, असा युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने या तिघांना २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. याबाबत पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले की, आरोपींकडे ज्या खात्यांची माहिती मिळाली आहे, त्या बँकांकडे आम्ही चौकशी करीत असून खातेदारांचे जबाब नोंदविण्यात येत आहे. यातील आणखी काही संशयित असून, त्यांच्या शोधासाठी परराज्यात पथके रवाना झाली आहे. हे आरोपी मिळाल्यानंतर हा नेमका प्रकार ते कसा करणार होते, बँकेतील खात्यांमधील रक्कम कशा प्रकारे काढून घेण्यात येणार होते, याबाबतची अधिक माहिती उपलब्ध होऊ शकेल.

अनघा मोडक ही सब शेअर ब्रोकरअनघा मोडक ही एका शेअर ब्रोकरची सब शेअर ब्रोकर म्हणून गेली काही वर्षे काम पाहत होती. २०१९ मध्ये सेबीने मिनिमम मॉर्जिन बेसचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेक शेअर ब्रोकरवर कारवाई करून त्यांचे डी-मॅट अकाऊंट बंद केले. ती ज्यांचे सब ब्रोकर म्हणून काम पाहत होती, त्यांचे अकाऊंट बंद झाल्याने त्याचा तिला फटका बसला होता. तिला वेगवेगळ्या लोकांची १२ कोटींची देणी असल्याचे ती पोलिसांना सांगत आहे. या शेअर व्यवसायातूनच तिची रोहन मंकणीशी ओळख झाली. हा डेटा विकून त्यातून अडीच कोटी मिळविण्याचा अनघा हिचा प्रयत्न होता. सुधीर भटेवरा याच्याकडे चौकशी सुरू असून, तो जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे नवटके यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसbankबँक