शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात परपुरुषाशी डान्स करणं महिलेच्या जीवावर बेतलं, पतीने केली पत्नीला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 17:37 IST

Murder Case : नाचण्यात दंग असलेल्या शांती देवीने घरी जाण्यास नकार दिला. त्यानंतर पती शीतल भारती रागाच्या भरात घरी निघून गेली.

झारखंड : लग्नसोहळ्यात परपुरुषासोबत नाचणं एका महिलेच्या जीवावर बेतलं आहे. झारखंडमधील चतरा येथे ही धक्क्कादायक घटना घडली आहे. लारकुवा गावात शनिवारी एक लग्नसोहळा सुरू होता. यावेळी गावातील महिला आणि पुरुष डीजेवर नाचत होते. यामध्ये काही पुरुष जोड्याने त्यांच्या पत्नीसोबत डान्स करत होते. याच लग्नात शांती देवी नावाची महिलाही तिचा पती शीतल भारतीसोबत नाचत होती. दरम्यान शांती देवीचा पती मद्यपान केलेल्या अवस्थेत होता. काही वेळ नाचल्यानंतर शांती देवीचा नवरा थांबला. नंतर त्याने शांती देवीला घरी जाण्याबाबत सांगितले. मात्र, नाचण्यात दंग असलेल्या शांती देवीने घरी जाण्यास नकार दिला. त्यानंतर पती शीतल भारती रागाच्या भरात घरी निघून गेली.

जवळपास दोन तासांनी जेव्हा शांती देवी घरी पोहोचली, तेव्हा पती शीतल भारती दरवाजा उघडण्यासाठी आला. त्याने पत्नीला उशीरा घरी येण्याचं कारण विचारलं, तेव्हा महिलेनं नाचत होती असं सांगितले. यानंतर नवऱ्याला राग अनावर झाला आणि त्याने घरातील लाठ्या बाहेर काढल्या आणि पत्नीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पती शीतल भारती रागाने रागाच्या भरात पत्नी शांती देवीला जवळपास १५ मिनिटे बेदम मारहाण केली. या मारहाणीत काही वेळातच पत्नीचा मृत्यू झाला.

आत्महत्या दाखवण्यासाठी मृतदेह लटकवलापत्नीच्या मृत्यूनंतर या प्रकरणाचा छडा लागू नये म्हणून पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाला आत्महत्येचे स्वरूप देण्याच्या उद्देशाने आणखी एक युक्ती आजमावली. कुटुंबीयांनी महिलेचा मृतदेह लटकवला.

पोलिसांनीअटक केलीनातेवाइकांनी स्वत: पोलिसांना फोन केला, त्यानंतर पोलीस पोहोचले, त्यांनी मृतदेह तपासणीसाठी रुग्णालयात आणला, मात्र शरीरावरील जखमांच्या खुणा पाहून महिलेचा खून झाल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी पतीला अटक केली तर इतर फरार आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसJharkhandझारखंडArrestअटकdanceनृत्य