शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या हक्काच्या खतावर डल्ला, भिवंडीत युरिया खताचा काळाबाजार उघड

By नितीन पंडित | Updated: October 15, 2022 13:09 IST

शेतकऱ्यांच्या हक्काचे खत चोरीच्या मार्गाने गोदामात; नारपोली पोलिसांनी १७ लाखांचा निमकोटेड युरियाचा साठा केला जप्त

भिवंडी  - शेतकऱ्यांसाठी अनुदान किमतीत शासन खत उपलब्ध करून देत असताना माफियां कडून शेतकऱ्यांच्या खतावर डल्ला मारून तो खत साठा व्यापारी उपयोगासाठी वापरात आणून बक्कळ नफा कमावणाऱ्या माफियावर नारपोली पोलीसांनी कारवाई करीत १७ लाख रुपयांचा निमकोटेड युरियाचा साठा गुरुवारी जप्त केला आहे.       पुर्णा येथील महालक्ष्मी वेअर हाउसच्या गोदामामध्ये निमकोटेड युरियाचे साठवणुक करून शासनाची व शेतकऱ्याची फसवणुक केली जात आहे अशी माहिती नारपोली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांना मिळाली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील,ब्रिजेश शिंदे,कळवा पोलीस ठाणे येथील सपोनि निलेश कानडे व पथकाने गोदामावर छापा टाकला.ज्यामध्ये गोदाम मालक प्रफुल्ल चंद्रकांत देशमुख,रा.नवी मुबंई यांच्या गोडावुनमध्ये साठवलेला व तेथे उभ्या असलेल्या ट्रक मध्ये ५० किलो वजनाच्या १७८६ गोणी निमकोटेड व संशयित साठवणुक केलेल्या युरियाचा १६ लाख ९६ हजार ७०० रुपये किमतीचा खत व मुद्देमाल जप्त केला आहे .           नारपोली पोलिसांनी जप्त केलेल्या निमकोटेड युरिया खताचे नमुने ठाणे कृषी विभाग यांच्या मदतीने नाशिक येथील खत चाचणी प्रयोगशाळा येथे तपासणी साठी पाठविले.तेथील अहवाल नुसार सदरचा युरिया हा शेतीसाठी खत म्हणून उपयोगात येणारा असल्याचे स्पष्ट झाल्याने ठाणे कृषी विभागातील जिल्हा गुणवत्ता नियंत्रक विजय तुपसौदर्य यांनी दिलेल्या तक्रारी वरून योग फारमा कंपनी व इतर संशयितांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाणे येथे फसवणुकीसह खत नियंत्रण व अत्यावश्यक वस्तु अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीसाठी दिलेला खत साठा काळ्या बाजारात-निमकोटेड युरियाची साठवणुक पुर्णा येथील आडवळणाच्या जागेत असलेल्या गोदामात सुरू होती.त्यामुळे पोलिसांच्या अथवा कोणाच्या नजरेस हा काळ्या बाजारातील खत साठा लक्षात येत नव्हता.पोलीसांनी खबऱ्याच्या मदतीने पाळत ठेवुन सापळा लावुन निमकोटेड युरियाची साठवणुक करून शासनाची व शेतकऱ्याची फसवणुक करणाऱ्याचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटची पाळेमुळे पोलीस तपासात समोर येतील त्यानुसार आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता तपास अधिकारी चेतन पाटील यांनी व्यक्त केली आहे.कृषी सोसायटी मार्फत अथवा शासनमान्य कृषी सेवा केंद्रातून विक्री साठी अत्यल्प दरात खत शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते.अशाच ठिकाणाहून शेतकऱ्यांच्या हक्काचा खताचा साठा माफिया काळ्या बाजारात विक्री साठी साठवीत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडीthaneठाणे