शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांच्या चिरमुडीवर लैगिक अत्याचार करून हत्या; धक्का बसलेल्या वडिलांनीही संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 20:27 IST

Crime News : लैगिक अत्याचार करून आरोपीनं केली चिमुरडीची हत्या. आरोपीला पोलिसांनी केली अटक

ठळक मुद्देलैगिक अत्याचार करून आरोपीनं केली चिमुरडीची हत्याआरोपीला पोलिसांनी केली अटक

केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेलीची राजधानी सिल्वासा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नरौली विस्तार येथील एका इमारतीत राहणारी तीन वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासात शेजारी राहणाऱ्या एका तरूणानं तिच्यावर लैगिक अत्याचार करून चाकू मारून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आली. इतकंच नाही तर त्या तरूणानं त्या मुलीचं मृत शरीर आपल्या अपार्टमेंटच्या खिडकीतून खाली फेकलं. त्यानंतर त्यानंत पुन्हा त्या मुलीचं मृत शरीर एका बॅगेत घालून रस्त्याच्या बाजूला फेकल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. या घटनेनंतर मुलीच्या वडिलांना जबर धक्का बसला होता. त्यांनी या धक्क्यातच आत्महत्या करून आपलंही आयुष्य संपवलं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरौली विस्तार येथील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील ३ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांच्या आसपासच्या परिसरात तिचा शोध घेतला. परंतु ती मुलगी सापडली नाही. तीन चार तासांच्या शोधानंतरही ती मुलगी सापजली नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी याची पोलिसांत तक्रार दाखल केली. ही घटना गंभीरतेनं घेत पोलिसांचं एक पथक त्यांच्या राहत्या ठिकाणी पोहोचलं आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला. दरम्यान, ती चिमुरडी दुपारी अन्य मुलींसह खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसंच ती आपल्या घरापासून दूरही गेली नसल्याचं पोलिसांना तपासादरम्यान समजलं. यावेळी पोलिसांनी ते कुटुंब राहत असलेल्या इमारतीतील सर्व घरांची झडती घेतली. पोलिसांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरातही झडती घेतली परंतु यादरम्यान, त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. परंतु त्याच्या घरातील बाथरूमच्या खिडकीची काच फुटली होती. यावरून पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी अपार्टमेंटच्या सर्व बाजूंना झडती घेतली. यावेळी त्यांना रस्त्यावर एक बॅग आढळून आली. या बॅगेत त्या चिमुरडीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी तपास केल्यानंतर त्या मुलीवर लैगिक अत्याचार करून तिच्यावर चाकूनं अनेकदा वार करत हत्या केल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी घेतलं ताब्यातपोलिसांना यापूर्वीच शेजारी राहणाऱ्या व्यक्तीवर संशय असल्यानं त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. याच दरम्यान, चिमुरडीच्या वडिलांना हे दु:ख सहन झालं नाही आणि त्यांना जबर धक्का बसला. यानंतर त्या चिमुरडीचे वडील फिनाईल प्यायले. कुटुंबीयांना याची माहिती मिळतात त्यांनी तातडीनं तिच्या वडिलांना रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस