नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील युनायटेड पेट्रो फायनान्स लिमिटेडच्या आयटीआय गोल्ड लोनच्या कार्यालयावर आज भरदिवसा सशस्त्र दारोडा अज्ञात गुंडांनी घातला आहे. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनातून सहा दरोडेखोर हत्यारांसह आले. या दरोडेखोऱ्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंधक बनवून १ कोटी ७५ लाख किंमतीचं सोनं लुटले आहे.सोनं पळवून नेत असताना या दरोडेखोरांनी चारचाकी गाडीमध्येच सोडली आणि दुचाकीवरून फरार झाले. या दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून पोलिसांनी दरोडेखोऱ्यांचे फोटो जाहीर केले आहे. पोलीस त्याद्वारे दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलीस ठाण्यापासून तीनशे मीटर अंतरावर सेन्ट्रल पार्क या मुख्य रस्त्यावर युनायटेड पेट्रो फायनान्स कंपनीचे गोल्ड लोनचे ऑफिस आहे. येथे सोनं तारण ठेवून त्यावर कर्ज दिलं जातं. तसेच येथे लॉकर सुविधा देखील दिली आहे.
दिवसाढवळ्या गोल्ड बँकेवर दरोडा; पावणे दोन कोटींचे सोने लुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 21:14 IST
या दरोडेखोऱ्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना बंधक बनवून १ कोटी ७५ लाख किंमतीचं सोनं लुटले आहे.
दिवसाढवळ्या गोल्ड बँकेवर दरोडा; पावणे दोन कोटींचे सोने लुटले
ठळक मुद्दे सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनातून सहा दरोडेखोर हत्यारांसह आले. दरोडेखोरांचे फोटो जारी करून नागरिकांना ते दिसल्यास माहिती देण्याचे आवाहन केले आहे.