शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भूमाफियांची दबंगगिरी, उल्हासनगर महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 22:34 IST

Crime News : उल्हासनगर कॅम्प नं-३ शांतीनगर परिसरात सुरू असलेल्या एका अवैध बांधकामाला प्रभाग समिती क्रं-१ च्या अधिकाऱ्यांनी नोटीस बजावून कामबंद ठेवण्याचे बजावले होते.

ठळक मुद्देशहरात अवैध बांधकामाचा सुळसुळाट झाला असून सर्रासपणे आरसीसी व टी ग्रेटरची अवैध बांधकामे उभी राहत आहे.

सदानंद नाईक

उल्हासनगर : शांतीनगर येथे सुरू असलेल्या अवैध बांधकाम थांबविण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना भूमाफियांनी एका खोलीत कोंडून मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी घडला. याप्रकरणी ब्रह्माणे यांच्यासह अन्य जनावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

उल्हासनगर कॅम्प नं-३ शांतीनगर परिसरात सुरू असलेल्या एका अवैध बांधकामाला प्रभाग समिती क्रं-१ च्या अधिकाऱ्यांनी नोटीस बजावून कामबंद ठेवण्याचे बजावले होते. मात्र महापालिकेच्या नोटिसला केराची टोपली दाखवून बांधकाम सुरूच ठेवण्यात आले. याची माहिती समिती मधील बिट मुकादम प्रकाश सकट व आत्माराम सोनावणे यांना मिळल्यावर, त्यांनी शनिवारी सुट्टी असताना अवैध बांधकाम ठिकाणी सकाळी साडे अकरा वाजता धाव घेतली. त्यांनी बांधकाम थांबविण्याची विनंती केल्यावर, बांधकाम सुरूच ठेवून दोघांना एका खोलीत नेण्यात आले. तसेच त्यांना मारहाण केली. झालेल्या प्रकारची माहिती वरिष्ठांना दिल्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरून ब्रह्माणे यांच्यासह ६ पेक्षा जास्त जनावर गुन्हा दाखल केल्याची माहिती महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. तसेच प्रभाग समिती क्रं-१ मधील अवैध बांधकामावर पाडकाम कारवाईचे संकेत त्यांनी दिले. 

शहरात अवैध बांधकामाचा सुळसुळाट झाला असून सर्रासपणे आरसीसी व टी ग्रेटरची अवैध बांधकामे उभी राहत आहे. अवैध बांधकाम प्रकरणी भाजपच्या शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिल्यावर, राणा डम्पिंग ग्राऊंडच्या पायथ्याशी उभे राहत असलेल्या अवैध चाळीच्या बांधकामावर सहायक आयुक्त अनिल खतूरानी यांच्या पथकाने पाडकाम कारवाई केली. मात्र शहरातील इतर शेकडो बांधकामावर कारवाई कधी? असा प्रश्न निर्माण झाला. महापालिका आयुक्तांनी एक विशेष पथक स्थापन करून अवैध बांधकामावर धडक कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगर