शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

'दबंग' डीसीपीच्या बायकोचीच पर्स चोरीला गेली...गजबजलेल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये खळबळ उडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 18:34 IST

याप्रकरणी एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देदबंग पोलीस अधिकारी असलेल्या शिवदीप लांडे यांच्या पत्नीची पर्स चोरीला गेली आहे. या प्रकरणी पोलीस सीसीटीव्ही आणि अन्य बाबींद्वारे तपास करत आहेत.

मुंबई - सीएसएमटी परिसरात असलेल्या क्रॉफर्ड मार्केट येथे दबंग पोलीस अधिकारी असलेल्या शिवदीप लांडे यांच्या पत्नीची पर्स चोरीला गेली आहे. त्यामुळे क्रॉफर्ड मार्केट परिसरात एकाच खळबळ उडाली होती. ही घटना शनिवारी घडली असून याप्रकरणी एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस सीसीटीव्ही आणि अन्य बाबींद्वारे तपास करत असल्याचं एल. टी. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली आहे. 

सध्या अमली पदार्थ विरोधी विभागाचे पोलीस उपायुक्त असलेले शिवदीप लांडे यांनी पाटणाचे पोलीस अधिकारी असताना गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या होत्या आणि त्यांची दबंग पोलीस अधिकारी अशी ओळख होती. त्यांची पत्नी डॉ. ममता शिवतारे - लांडे यांची गणपती उत्सवाच्या खरेदीसाठी क्रॉफर्ड मार्केटमध्ये उसळलेल्या गर्दीचा फायदा घेत पर्स चोरली आहे. क्रॉफर्ड मार्केटमधील बादशाह ज्यूस सेंटरनजीक असलेल्या शेख मेनन लेनमध्ये काही अज्ञात चोरट्यांनी भांडण करण्याचे नाटक करून ममता यांची पर्स लांबवली आहे. ममता या स्त्रीरोगतज्ञ असून शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांची मुलगी आहे. चोरीस गेलेल्या पर्समध्ये डॉ. ममता यांचे ओळखपत्र, पॅन कार्ड, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, २ हजार रुपये होते. 

 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई