शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Video : डी. के. राव हस्तक हत्याप्रकरण : मालमत्तेच्या वादावरून हत्या केल्याचा संशय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 19:18 IST

ही हत्या मीरा रोड येथील मालमत्तेतून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

ठळक मुद्देमुख्य आरोपी इम्रान कुरेशीला ठोकण्यात वडाळा टी. टी. पोलिसांना यश आले आहे.इम्रान नवी मुंबईतील कळंबोली येथील राहत्या घराजवळ येणार असल्याची माहिती मिळालीही हत्या मीरा रोड येथील मालमत्तेतून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मुंबई- कुख्यात गुंड डि.के.रावचा हस्तक टी. पी. राजाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी इम्रान कुरेशीला ठोकण्यात वडाळा टी. टी. पोलिसांना यश आले आहे. ही हत्या मीरा रोड येथील मालमत्तेतून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सायन कोळीवाडा परिसरातील म्हाडा कॉलनीतील सूर्यनिवासमध्ये राजा तिसऱ्या मजल्यावर राहत होता. 7 डिसेंबरला भरदिवसा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी मारीमुथू पेरियास्वामी देवेंद्र उर्फ टी. पी. राजा (41) हा घरी असताना अमजद आणि इम्रान यांनी घरात घुसून हत्या केली होती. हत्या झाली त्यावेळी राजा एकटाच घरी होता. त्यावेळी या दोघांनी त्याच्या घरात घुसून चाकूने राजावर सपासप असंख्य वार केले. तसेच मृत्यूनंतर ही त्याचा गळा सुऱ्याने चिरून त्याच्या डोक्यात एक गोळी झाडली. या हत्येनंतर आरोपींना तेथून पळ काढला. मात्र, त्यांची दुचाकी चालू न झाल्यानंतर ती तेथेच सोडून आरोपी पळून गेले होते. पोलिसांनी सीसीटिव्ही आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली. तपासात राजाची हत्या करणारे इम्रान आणि अमजद खान हे दोघे असल्याचे निष्पन्न झाले. तपासात अमजद मकबूल खान हा राजस्थानमध्ये असल्याची माहिती वडाळा टी. टी. पोलिसांना मिळताच त्यांच्या पथकाने 16 डिसेंबरला खानला अमजदला अटक केली होती. मात्र, मुख्य आरोपी इम्रान पोलिसांच्या हाती लागत नव्हता. नववर्षांच्या पूर्वसंध्येसाठी इम्रान नवी मुंबईतील कळंबोली येथील राहत्या घराजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.   

टॅग्स :MurderखूनArrestअटकPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई