सायबर चोरांनी हायकोर्टाच्या वकिलाला २७ हजारांना लुटले 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 08:05 PM2018-10-12T20:05:40+5:302018-10-12T20:06:40+5:30

अज्ञात व्यक्तींनी माहिती चोरून हे पैसे लंपास केल्याचे लक्षात आल्यानंतर शर्मा यांनी पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पायधुनी पोलीस अधिक तपास करत आहे.

Cyber ​​thieves robbed 27 thousand of the High Court lawyer | सायबर चोरांनी हायकोर्टाच्या वकिलाला २७ हजारांना लुटले 

सायबर चोरांनी हायकोर्टाच्या वकिलाला २७ हजारांना लुटले 

मुंबई -  डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरून कार्ड क्लोनिंगद्वारे नागरिकांना गंडा घालणाऱ्या सायबर चोरट्यांनी देशभरात धुमाकुळ घातला आहे. नुकतीच या चोरट्यांनी पायधुनी परिसरातील हायकोर्टाच्या एका वकिलाला २७ हजार रुपयांचा चुना लावला आहे.

मूळचे उत्तरप्रदेशचे मनमोहन शर्मा हे मस्जिद बंदर येथे आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. शर्मा हे हायकोर्टात वकील म्हणून कार्यरत आहेत. शर्मा यांचं मांडवी येथील शाखेत खाते असून त्यातूनच व्यवहार करतात. ९ आॅक्टोबर रोजी शर्मा हे त्यांच्या घरी असताना त्यांच्या मोबाइलवर एका मागोमाग एक मेसेज येऊ लागले. त्यांच्या खात्यातून ४ वेळा पैसे काढण्यात आले होते. तीन वेळी १४ हजार ९०० रुपये काढले. तर चौथ्यांदा १२ हजार ५०० रुपये काढले. यासंदर्भात त्यांनी बँकेच्या कस्टमर केअरला फोन करून माहिती देत त्यांचे कार्ड ब्लाॅक करून घेतले. अज्ञात व्यक्तींनी माहिती चोरून हे पैसे लंपास केल्याचे लक्षात आल्यानंतर शर्मा यांनी पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी पायधुनी पोलीस अधिक तपास करत आहे.

Web Title: Cyber ​​thieves robbed 27 thousand of the High Court lawyer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.