लॉकडाऊनमध्ये सक्रिय झाले सायबर गुन्हेगार, महिलांना केलं जातंय टार्गेट 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 06:50 PM2020-05-01T18:50:03+5:302020-05-01T18:52:43+5:30

या घातक विषाणूमुळे देशात आतापर्यंत 1,147 लोकांचा बळी गेला आहे.

Cyber criminals active in lockdown, targeting women pda | लॉकडाऊनमध्ये सक्रिय झाले सायबर गुन्हेगार, महिलांना केलं जातंय टार्गेट 

लॉकडाऊनमध्ये सक्रिय झाले सायबर गुन्हेगार, महिलांना केलं जातंय टार्गेट 

Next
ठळक मुद्देफेब्रुवारी आणि मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये 54 सायबर क्राइमच्या तक्रारी ऑनलाईन नोंद झाल्या आहेत.देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आयोग ऑनलाईन तक्रारी करत आहे.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरस रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनदरम्यान महिलांवरील सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी 25 मार्च ते 14 एप्रिल या कालावधीत देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला, नंतर ते ३ मेपर्यंत वाढविण्यात आला. या घातक विषाणूमुळे देशात आतापर्यंत 1,147 लोकांचा बळी गेला आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी आणि मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये 54 सायबर क्राइमच्या तक्रारी ऑनलाईन नोंद झाल्या आहेत. आकडेवारीनुसार मार्चमध्ये 37 आणि फेब्रुवारीमध्ये 21 तक्रारी दाखल झाल्या आहेत. देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आयोग ऑनलाईन तक्रारी करत आहे.
 

आकांक्षा फाऊंडेशनचे संस्थापक  आकांक्षा श्रीवास्तव म्हणाले की , २५ मार्च ते २५ एप्रिल या कालावधीत आमच्याकडे सायबर गुन्हेगारीच्या एकूण ४१२ तक्रारी आल्या आहेत. यापैकी ३९६ तक्रारी गंभीर आहेत. यात गैरवर्तन, अशोभनीय वर्तन, अश्लील व्हिडिओ, धमक्या, खंडणी मागण्या आणि ब्लॅकमेलच्या लालसेचा समावेश आहे.

 

बापरे! लॉकडाऊनमध्ये आईने मुलाला पाठविले किराणा आणायला अन् घेऊन आला बायको

Coronavirus Lockdown : धार्मिक सभा रोखणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, पाचजण जखमी 

 

सांगलीत एकाचा खून, मृतदेह पोत्यातून नदीत टाकला

 

Coronavirus : व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर अश्लील फोटो पाठवणाऱ्या अधिकाऱ्याला हटवले पदावरून

 

Web Title: Cyber criminals active in lockdown, targeting women pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.