शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारीचे नवे माध्यम; आता इन्स्टाग्रामवरून मागितली खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 09:28 IST

माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. इन्स्टाग्रामवरून खंडणी मागितल्याचा हा पहिलाच गुन्हा वसईत दाखल झाला आहे.

वसई : एखाद्याला ब्लॅकमेल करण्यासाठी जीमेल, मोबाईल, फेसबूकसारख्या माध्यमांचा याआधी वापर केला जात होता. आता गुन्हेगारांनी थोडे पुढचे पाऊल टाकले आहे. फोटोंसाठी प्रसिद्ध असलेले इन्टाग्रामवरच खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. 

माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. इन्स्टाग्रामवरून खंडणी मागितल्याचा हा पहिलाच गुन्हा वसईत दाखल झाला आहे. वसईच्या माणिकूपर पोलीस ठाण्यात राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुण, तरुणीचे प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी या तरुणाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका अनोळखी अकाऊंटवरून मेसेज आला. त्या मेसेजमध्ये या जोडप्याची एक आक्षेपार्ह चित्रफित टाकून ही चित्रफित इन्स्टाग्रामवर प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली होती. जर हे थांबवायचे असेल तर ९० हजार रुपये खंडणी बिटकॉईनच्या माध्यमातून देण्याची मागणी त्याने केली.

फिर्यादी तरुणाने ५० हजार रुपये देण्याची तयारी दर्शवली. मात्र, अनोळखी इसमाकडून व्हिडीओंचा गैरवापर होण्याची भीती होती. त्यामुळे शेवटी त्याने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरोधात भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३८४ अन्वये खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 माणिकपूर पोलिसांनी याप्रकऱणी इन्स्टाग्रामला संपर्क केला असून संबंधित खात्याची तांत्रिक माहिती मागवली आहे. हे खाते बनावट आहे. मात्र, तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला पकडण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. अशाप्रकारे इन्स्टाग्रामवरून ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचे हे पहिलेच प्रकरण असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खाजगी छायाचित्रे काढताना काळजी घ्याया प्रकरणात फिर्यादी जोडप्यांनी काढलेले खाजगी छायाचित्रे आणि चित्रफित ही लिक झाली आणि अज्ञात व्यक्तीच्या हाती सापडली. त्या आधारे तो ब्लॅकमेल करत आहे. अशी खाजगी छायाचित्रे आणि चित्रफिती काढणे धोकादायक असल्याने ती काढू नये असे पोलिसांनी सांगितले. मोबाईल हरवला, तो दुरूस्तीला दिला तर मोबाईल मध्ये असलेल्या खाजगी छायाचित्रांचा गैरवापर केला जातो. तसेच मोबाईल हॅक करूनही अशी छायाचित्रे पळवली जातात, असे पोलिसांनी सांगितले.

आम्ही या प्रकरणी इन्स्टाग्राम कंपनीशी संपर्क करून तपासकामात मदत मागितली आहे. खंडणी मागणाऱ्याचे खाते बनावट आहे. मात्र, इन्स्टाग्रामने काही तांत्रिक माहिती दिलेली आहे. त्याद्वारे आम्ही आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत.- राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माणिकपूर पोलीस ठाणे

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामExtortionखंडणीPoliceपोलिस