मुंबई/नवी दिल्ली : पाँझी स्किममार्फत भारतातील ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्या ऑक्टाएफएक्स या फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर शुक्रवारी ईडीने कारवाई करत २,३८५ कोटी रु.ची क्रिप्टोकरन्सी जप्त केली आहे. तर स्पेनमध्ये या घोटाळ्याचा सूत्रधार पावेल प्रोझोरोव्ह याला अटक केली आहे.
ऑक्टाएफएक्सचे कारनामेजुलै २२ ते एप्रिल २३ या काळात भारतीय ग्राहकांचे १,८७५ कोटी रु. डुबवले; ८०० कोटी रु.चा नफा कमावला.२०१९-२०२४ मध्ये कंपनीने केवळ भारतातून ५ हजार कोटी रु.चा नफा कमावला. ग्राहकांकडून यूपीआय व बँकांमार्फत पैसा घेतला जात होता.हा पैसा डमी अकाउंटमार्फत परदेशात गुंतवणूक म्हणून दाखवला जायचा.
आर्थिक व्यवहारांचे जाळेऑक्टाएफएक्सची मार्केटिंग टीम ब्रिटिश व्हर्जिन बेटांवरून काम करते. स्पेनमधून सर्व्हर व बॅक ऑफिस ऑपरेशन चालतात. इस्टोनियातून पेमेंट गेटवे चालवला जातो. जॉर्जियातून तांत्रिक साहाय्य मिळते. भारतीयांचा पैसा सायप्रसमध्ये जमा केला जातो. दुबईतून काही भारतीय व्यवहार सांभाळले जातात. सिंगापूरमधून आयातीसंदर्भात बोगस सेवा दिली जाते.
पावेल प्रोझोरोव्ह मास्टरमाइंड : पावेल हा स्पेन, इस्टोनिया, रशिया, हाँगकाँग, सिंगापूर, यूएई व युकेतून व्यवहार करायचा.
Web Summary : ED seized ₹2,385 crore in cryptocurrency from OctaFX, a Ponzi scheme. The mastermind, Pavel Prozorov, was arrested in Spain. OctaFX allegedly defrauded Indian customers of crores, routing funds via dummy accounts to various countries, amassing significant profits between 2019-2024.
Web Summary : ईडी ने पोंजी स्कीम ऑक्टाएफएक्स से 2,385 करोड़ रुपये की क्रिप्टोकरेंसी जब्त की। सरगना पावेल प्रोझोरोव्ह को स्पेन में गिरफ्तार किया गया। ऑक्टाएफएक्स पर भारतीय ग्राहकों को धोखा देने और डमी खातों के माध्यम से विभिन्न देशों में धन भेजने का आरोप है, जिसने 2019-2024 के बीच भारी मुनाफा कमाया।