शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बाळाला स्तनपान देताना कारने चिरडले; बोरिवलीतील घटनेत आईचा मृत्यू, बाळ गंभीर जखमी; चालकाचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 08:15 IST

मनीषा म्हात्रे -  मुंबई :  पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर फुगे विकून आल्यानंतर रात्री बाळाला दूध पाजत असतानाच एका मातेवर ...

मनीषा म्हात्रे - मुंबई:  पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर फुगे विकून आल्यानंतर रात्री बाळाला दूध पाजत असतानाच एका मातेवर काळाने घाला घातला. बोरीवलीतील आर. एम. भट्ट रोडवर ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. भरधाव कारचालकाने या मातेला अक्षरश: चिरडले, तर तिच्या कुशीत विसावलेले बाळ अपघातात थोडक्यात बचावले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर माय-लेकाला रक्ताच्या थारोळ्यात सोडून फरार झालेल्या निर्दयी कारचालकाचा बोरिवली पोलीस शोध घेत आहेत.मुळचे राजस्थानातील रहिवासी असलेले बावरिया कुटुंब ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात गेल्या दोन महिन्यापासून भाडेतत्त्वावर राहते. धनराज बावरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोकरीच्या शोधात दोन मुलांना गावी ठेवून पत्नी लाडबाई (२९) आणि पाच महिन्यांच्या देवांशसह मुंबई गाठली. नोकरी न मिळाल्याने मुंबईच्या सिग्नलवर फुगे व स्ट्रीट लाइट विकून उदरर्निवाह सुरू केला. नेहमीप्रमाणे, १ फेब्रुवारीला सकाळी पत्नीसोबत कोरा केंद्र सिग्नल येथे फुगे विकण्यासाठी आलो. पत्नी मुलासह सिग्नलच्या दुसऱ्या बाजूला फुगे विकत होती, तर मी दुसऱ्या ठिकाणी होतो. रात्री आठच्या सुमारास पत्नीला कारने धडक दिल्याचे समजताच मी तिच्या दिशेने धाव घेतली तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पत्नी आणि जखमी अवस्थेत देवांश दिसला. मी क्षणाचाही विलंब न करता दोघांनाही रिक्षातून शताब्दी रुग्णालयात गाठले.

राजस्थानमध्ये महिलेवर अंत्यसंस्कारधनराज बावरिया यांनी सांगितले की, उपचारादरम्यान डॉक्टरांनी पत्नीला मृत घोषित केले, तर देवांशच्या पायाचे हाड मोडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बाळाला स्तनपान करीत असताना कारचालकाने तिला धडक देत पळ काढला. मात्र, बाळाला घट्ट कवटाळून ठेवल्यामुळे ते थोडक्यात बचावले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून कार्यवाही पूर्ण केल्यानंतर तिचा मृतदेह ताब्यात मिळाला. त्यानंतर बावरिया कुटुंबीय राजस्थानला रवाना झाले आहेत. तेथे पत्नीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत, कारचालकाचा शोध सुरू केला आहे. निनाद सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बोरीवली पोलीस ठाणे पत्नीमुळे तीन मुलांचा सांभाळ करणे शक्य होते. आता तीही सोबतीला नाही. अपघातात लहान मुलाचा एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. इथे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत. अशात मुलाच्या उपचाराचा खर्च कसा भागवायचा असाही प्रश्न निर्माण झाला आहे.  पोलिसांनी लवकर त्या  चालकावर कठोर कारवाई करावी.- धनराज बावरिया, तक्रारदार

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcarकारRajasthanराजस्थान