शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

आर्यन खानने कट रचल्याचा कुठलाही पुरावा मिळाला नाही, Whatsapp चॅटमध्ये आक्षेपार्ह काही नाही - हायकोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2021 18:59 IST

Cruise Drug Party Case : अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाकडे ड्रग्ज सापडले. ते विकण्याजोगे नव्हते. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचा कट रचल्याचं दिसून येत नाही,  अशी माहिती जामीन आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. 

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात हायकोर्टातून जामीन मिळाला आहे. आर्यन खानचीही तुरुंगातून सुटका झाली आहे. आता याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा सविस्तर आदेश समोर आला आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, असा कोणताही पुरावा नाही, ज्यावरून आरोपीने हा गुन्हाचा कट रचला होता हे सिद्ध होतं.  हायकोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, आर्यन आणि अरबाज मर्चंट क्रूझवर स्वतंत्रपणे प्रवास करत होते, त्यांनी ड्रग्ज घेण्याची कोणतीही योजना आखल्याचा कोणताही पुरावा नाही. 

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. हे मान्य केले तरी या प्रकरणात कमाल शिक्षा एक वर्षाची आहे. सुमारे २५ दिवस आरोपी तुरुंगात आहेत. संबंधित वेळी त्याने अंमली पदार्थांचे सेवन केले होते की नाही हे ठरवण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली नाही. आर्यन खानच्या व्हाट्सअ‍ॅप चॅटमध्ये आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत. अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाकडे ड्रग्ज सापडले. ते विकण्याजोगे नव्हते. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचा कट रचल्याचं दिसून येत नाही,  अशी माहिती जामीन आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. 

आर्यन खानला २८ ऑक्टोबरला जामीन मंजूर झाला होताक्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्थर रोड तुरुंगात बंद असलेल्या आर्यन खानला २६ दिवसांनंतर २८ ऑक्टोबरला हायकोर्टातून जामीन मिळाला. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर आर्यन खानची ३० ऑक्टोबर रोजी तुरुंगातून सुटका करण्यात आली. हायकोर्टाने आर्यन खानला १४ अटींसह जामीन मंजूर केला होता.यामध्ये प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहून आपली उपस्थिती लावावी, अशीही अट होती. खटल्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत आर्यन खान परदेशात जाऊ शकणार नाही, असेही सांगण्यात आले.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानHigh Courtउच्च न्यायालयNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप