शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरता! महिलेवर गँगरेप करून अंगावर बाईक घातली, नंतर रेल्वे रुळावर फेकून आरोपी गेले पळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 13:29 IST

Gangrape Case : महिलेचा डावा पाय कापावा लागला

मथुरेत एका महिलेवर सामूहिक बलात्काराची अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी आधी सामूहिक बलात्कार केला आणि नंतर पीडितेच्या अंगावर दुचाकी घातली. यानंतर महिलेला रेल्वे रुळावर फेकून आरोपी पळून गेले. उपचारादरम्यान डॉक्टरांना महिलेचा डावा पाय कापावा लागला. हे प्रकरण कोसीकलां भागातील पोलीस ठाणे आहे.कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर महिला बेशुद्ध झालीठाणे कोसीकलां भागातील एका गावात एक महिला राहते. पोलिसांना तिने दिलेल्या तक्रारीमध्ये महिलेने म्हटले आहे की, "24 मे 2022 रोजी ती बँकेतून पैसे काढण्यासाठी जात होती. वाटेत तिची गावातील रहिवासी महेशशी भेट झाली. महेश बाईकने कोसीकलांला जात होता. तिला एकटं पाहून महेशने कोसीला सोडण्याबाबत सांगितल्यानंतर ती बाईकवर बसली.गावापासून काही अंतरावर गेल्यावर महेशला वाटेत त्याचा मित्र महेंद्र भेटला. तोही त्या दोघांसोबत गेला. त्यानंतर कोसीजवळ पोहोचल्यानंतर महेंद्र आणि महेशने तिला पिण्यासाठी थंड पेय दिले. ते प्यायल्यानंतर ती बेशुद्ध पडली. त्यानंतर महेश आणि महेंद्रने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर महेश आणि महेंद्र यांनी महिलेच्या अंगावर बाईक घातली . त्यानंतर कोसीकलां येथील महावीर गार्डनजवळून जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर महिलेला फेकून दोघांनी पळ काढला, असे पीडितेने सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "तेथून जाणाऱ्या काही अनोळखी व्यक्तीने डीआरपीला रेल्वे ट्रॅकवर जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेची माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या जीआरपीने महिलेला कोसी येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले आणि तिच्या कुटुंबीयांना तेथे माहिती दिली. तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने मथुरा येथे रेफर करण्यात आले, परंतु काही दिवस तेथे राहिल्यानंतरही काही फायदा न झाल्याने कुटुंबीय त्यांना आग्रा येथे घेऊन गेले.पलवलमध्ये उपचारादरम्यान महिलेचा पाय कापावा लागला होता, आग्रा येथे उपचार सुरू होते. परंतु, तिच्या पायात जंतूसंसर्ग वाढत होता. उपचाराचा खर्च जास्त असल्याने कुटुंबीयांनी त्याला पलवल येथील सरकारी रुग्णालयात नेले. तिथे पायात जास्त संसर्ग झाल्याने डॉक्टरांना त्याचा डावा पाय कापावा लागला.

महिलेने सांगितले की, उपचारांमुळे एफआयआर लिहिण्यास उशीर झाला असून पीडितेने मंगळवारी कोसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पीडितेने तक्रारीमध्ये लिहिले की, कुटुंबीय तिच्या उपचारात व्यस्त होते, त्यामुळे ते पोलिसांना माहिती देऊ शकले नाहीत. एफआयआर नोंदवून कारवाई करण्याची मागणी पीडितेने पोलिसांकडे केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोसी पोलिस स्टेशनचे प्रभारी अनुज कुमार म्हणाले, "महिलेच्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे."

 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश