शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

Video : पंजाब पोलिसांचे क्रौर्य, एसएचओने गरीब भाजी विक्रेत्याच्या टोपलीवर मारली लाथ, आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 19:47 IST

Cruelty of Punjab police : त्यांच्या जागी बलविंदर सिंग यांची ठाणे शहराचे एसएचओ म्हणून नियुक्त केले गेले आहे. नंतर डीजीपी दिनकर गुप्ता यांनी या कृत्यासाठी नवदीप सिंग यांना निलंबित केले.

ठळक मुद्दे एसएचओ नवदीप सिंग बुधवारी सराई रोडवरील भाजीपाला फेरीवाल्याजवळ पोहोचले. तेथे त्याला एका गोष्टीचा इतका राग आला की, त्याने संतापाच्या भरात भाजीच्या टोपलीला लाथ मारून उडवून दिली.

फागवारा - कोरोना कालावधीत शासकीय सूचनांचे पालन करताना पंजाबपोलिसांचा क्रूर चेहरा समोर आला आहे. बुधवारी चर्चेत असलेले शहरातील पोलीस ठाण्याच्या एचएचओ नवदीप सिंग यांचा संताप इतका अनावर झाला की त्यांनी लाथा मारून सराई रोडवरील भाजी विक्रेत्याच्या भाजीपाल्याच्या टोपल्या पायाने तुडवून उलटून दिल्या. एसएचओच्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडालीच पण रोष देखील व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कुणीतरी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसएसपी कंवरदीप कौर यांनी तातडीने कारवाई करत एसएचओ नवदीप सिंगची झाडाझडती घेतली. त्यांच्या जागी बलविंदर सिंग यांची ठाणे शहराचे एसएचओ म्हणून नियुक्त केले गेले आहे. नंतर डीजीपी दिनकर गुप्ता यांनी या कृत्यासाठी नवदीप सिंग यांना निलंबित केले.एसएचओ नवदीप सिंग बुधवारी सराई रोडवरील भाजीपाला फेरीवाल्याजवळ पोहोचले. तेथे त्याला एका गोष्टीचा इतका राग आला की, त्याने संतापाच्या भरात भाजीच्या टोपलीला लाथ मारून उडवून दिली. हे पाहून तेथे उपस्थित लोक घाबरून गेले आणि पळून गेले. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ बनवून कोणीतरी व्हायरल केले, हा व्हिडीओ फागवारा येथे चर्चेचा विषय ठरला आहे.एसएचओ नवदीप सिंह अनेकदा चर्चेतनवदीप सिंह बर्‍याचदा कुठल्या ना कुठल्या गोष्टीबद्दल चर्चेत असतं. फागवारा येथे नवदीप सिंह संबंधित पोलीस ठाण्यात रुजू झाल्यानंतर चोरी व इतर गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या आहेत, त्या पोलीस सोडवू शकले नाहीत. सरकारच्या निर्देशांचे पालन करण्याच्या नावाखाली सामान्य लोकांवर अत्याचार केल्याचा आरोप नवदीप सिंगवर आहे. आता आर्थिक दुर्बल भाजी विक्रेत्यासोबत एसएचओचे असे वागणे खाकीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे.नियमांचे पालन केले पाहिजे परंतु तसे नाहीसामान्य लोक म्हणतात की, कोविड -१९ ची सतत वाढ होणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सरकारी नियम आणि कायदा पाळणे देखील खूप महत्वाचे आहे. शासकीय आदेशांचे पालन करणे हे पोलिस प्रशासनाचेही कर्तव्य आहे, परंतु एखाद्या गरीब माणसाबरोबर पोलिसांचे असे वर्तन निंदनीय आहे. एखाद्या कमकुवत भाजी विक्रेत्याला अशा प्रकारे वागणूक देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई केली जावी.

प्रभारी पीसीआरचीही बदली झालीत्यांच्यासमवेत एसएचओ नवदीप सिंग यांच्या जागी पीसीआर प्रभारी बलजिंदर सिंग मल्ली यांची नेमणूक करण्यात आली. एसएसपी कंवरदीप कौर यांनी नवदीप सिंग तसेच बलजिंदर सिंग मल्ली यांची बदली केली आहे. एसएचओ नवदीप निलंबित, डीजीपी यांनी ट्विट केलेडीजीपी पंजाब दिनकर गुप्ता यांनी या प्रकरणाला लज्जास्पद आणि असह्य कृत्य म्हटले आहे. डीजीपी यांनी ट्विट केले की, पोलिस कोणत्याही किंमतीला असे वर्तन सहन करणार नाहीत. यासाठी एसएचओ नवदीप सिंग यांना तातडीने प्रभागातून निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये इतर कोणीही सामील झाल्याचे आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल.

 

 

टॅग्स :PoliceपोलिसPunjabपंजाबcorona virusकोरोना वायरस बातम्याhawkersफेरीवालेvegetableभाज्याsuspensionनिलंबन