क्रूरता! आई आणि भाऊ बहिणीवर जीवघेणा हल्ला करत आरोपीची विष पिऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 16:06 IST2022-06-05T16:06:17+5:302022-06-05T16:06:50+5:30

गेल्या रात्री सुरेंद्र कच्छनं धारदार खुरप्याने आई राधिका, भाऊ कृष्णा कच्छ आणि बहीण सरिता कच्छ यांच्यावर प्राणघातक हल्ला केला

Cruelty! Accused commits suicide by attacking mother and siblings | क्रूरता! आई आणि भाऊ बहिणीवर जीवघेणा हल्ला करत आरोपीची विष पिऊन आत्महत्या

क्रूरता! आई आणि भाऊ बहिणीवर जीवघेणा हल्ला करत आरोपीची विष पिऊन आत्महत्या

बस्तर - छत्तीसगडच्या जगदलपूर इथं मुलाने आई, छोटा भाऊ आणि बहिणीवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात आईचा जागीच मृत्यू झाला तर भाऊ बहिण गंभीररित्या जखमी आहेत. या हल्ल्यानंतर आरोपी मुलानं विष पिऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना काँग्रेसचे माजी आमदार मन्नुराम कच्छ यांचे मोठे बंधू सुखराम कच्छ यांच्या टोकापल निवासस्थानी घडली.

बस्तर पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या रात्री सुरेंद्र कच्छनं धारदार खुरप्याने आई राधिका, भाऊ कृष्णा कच्छ आणि बहीण सरिता कच्छ यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आई राधिका यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर भाऊ आणि बहिण गंभीररित्या जखमी झालेत. घटनेवेळी आरोपीनं भाऊ आणि बहिणीच्या रूमला बाहेरून बंद केले होते. परंतु आरडाओरड झाल्यानं शेजारील लोक घरी पोहचले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

या घटनेबाबत एसीपी ओम प्रकाश शर्मा म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या जखमी सरिता यांची चौकशी केली. पेट्रोल पंप व्यवसायात नुकसान झाल्यानं सुरेंद्र कच्छ खूप चिंतेत होता. त्यामुळे रागाच्या भरात त्याने घरच्यांवर जीवघेणा हल्ला केला अशी माहिती समोर आली. कौटुंबिक नातेवाईकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कच्छ कुटुंबाचं डिलमिली आणि गीदम रोड येथे पेट्रोल पंप आहेत. त्यावरून घरात काही वाद सुरू होता. याच वादातून आणि व्यवसायात नुकसान झाल्याने मोठ्या मुलाने हे हत्याकांड घडवून आणले आणि स्वत:ही सुसाईड केली. 

Web Title: Cruelty! Accused commits suicide by attacking mother and siblings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.