शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
3
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
4
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
5
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
6
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
7
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
8
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
9
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
10
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!
11
E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा...
12
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
13
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
14
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
15
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
16
रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये महिला रुग्णावर बलात्कार; गुंगीचं इंजेक्शन दिलं अन्...
17
कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
18
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
19
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
20
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले

३५०० रुपयांसाठी देशाशी गद्दारी, पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या CRPF जवानाचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 11:38 IST

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सीआरपीएफचा सब इन्स्पेक्टर मोती राम जाटबद्दल अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सीआरपीएफचा सब इन्स्पेक्टर मोती राम जाटबद्दल अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. मोती रामला आता एनआयएने ताब्यात घेतलं आहे. मोती रामवर पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती देण्याचा आरोप आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी मोती राम तेथे तैनात होता. तो गेल्या दोन वर्षांपासून हे हेरगिरीचे काम करत होता. ज्या महिला पाकिस्तानी एजंटने पहिल्यांदा त्याच्याशी संपर्क साधला तिने स्वतःची ओळख एका मोठ्या टीव्ही चॅनेलची पत्रकार म्हणून करून दिली होती. ती मोती रामला दरमहा ३५०० रुपये देत असे. विशेष माहितीसाठी ती १२००० रुपये द्यायची.

एका महिलेने मोती रामशी संपर्क साधला तेव्हापासून हे प्रकरण सुरू झालं. महिलेने चंदीगडची पत्रकार असल्याचं सांगितलं. तिने मोती रामकडून काही माहिती मागितली. मेसेज आणि व्हिडीओ कॉलनंतर मोती रामने तिच्यावर विश्वास ठेवला. त्याने गोपनीय कागदपत्रे शेअर करण्यास सुरुवात केली. काही महिन्यांनंतर, एक माणूस त्याच्याशी बोलू लागला. तो पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी होता. त्याने स्वतःची ओळख त्याच वृत्तवाहिनीचा पत्रकार म्हणूनही करून दिली. मोती रामनेही त्याच्यावर विश्वास ठेवला.

देशाशी गद्दारी करणाऱ्याला ठाण्यातून अटक; पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात, ATS ची मोठी कारवाई

मोती रामच्या फोनमधून उघड झालं रहस्य

केंद्रीय गुप्तचर संस्था आणि सीआरपीएफने मोती रामच्या फोनचा तपास केला. त्याच्या फोनमध्ये या सर्व चॅट्स सापडल्या. मोती रामने कोणताही मेसेज डिलीट केला नाही. त्याने अनेक गोपनीय कागदपत्रे शेअर केली. यामध्ये सुरक्षा दलांच्या तैनातीची माहिती होती. जवानांच्या हालचालींची माहिती होती. गुप्तचर संस्थांच्या मल्टी-एजन्सी सेंटर (एमएसी) कडून एक रिपोर्ट होता. दहशतवाद्यांच्या संभाव्य ठिकाणाची माहिती देखील होती. अनेक वेळा मोती रामने वर्तमानपत्रातील कटिंग्ज पाठवल्या. पण पाकिस्तानी एजंटनी त्याला सार्वजनिक माहिती देऊ नकोस असं सांगितलं.

"पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी बेकायदेशीर काम केलेलं नाही"; जेलमध्ये काय म्हणाली ज्योती मल्होत्रा?

दर महिन्याच्या ३५०० रुपये

पाकिस्तानी एजंट दर महिन्याच्या चार तारखेला ३५०० रुपये देत असत. हे पैसे मोती राम आणि त्याच्या पत्नीच्या बँक खात्यात येत असत. विशेष माहितीसाठी १२००० रुपये अतिरिक्त दिले जात होते. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्याच्या पाच दिवस आधीच मोती रामला दिल्लीला पाठवण्यात आलं. त्याने गृहमंत्री अमित शाह यांच्या जम्मू आणि काश्मीर दौऱ्याची माहिती शेअर केली. ही माहिती वृत्तवाहिन्यांवर होती. पण मोती रामने ती वेगळ्यापद्धतीने सांगितली. सुरक्षेच्या कारणास्तव ५० पर्यटन स्थळं बंद करण्यात आली आहेत असंही त्याने सांगितलं.

 पाकिस्तानात फिरताना ज्योतीच्या आजुबाजुला AK-47 घेऊन ६ गनर्स, Video ने उलगडलं रहस्य

२०२३ पासून करत होता हेरगिरी

एनआयएने मोती रामला दिल्लीतून अटक केली. एनआयएने दिलेल्या माहितीनुसार, तो २०२३ पासून हेरगिरी करत होता. त्याने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती दिली. पाकिस्तानी एजंटने त्याच्या खात्यात पैसे जमा केले. हे पैसे अनेक मार्गांनी पाठवले जात होते. अटकेपूर्वी गुप्तचर संस्था आणि सीआरपीएफने त्याची चौकशी केली. मोती रामला पटियाला हाऊस कोर्टाच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndian Armyभारतीय जवानCrime Newsगुन्हेगारी