शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Child Pornography CBI Raid: चाईल्ड पॉर्नोग्राफी प्रकरणी छापा मारण्यास गेलेल्या सीबीआय टीमवर जमावाचा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 11:29 IST

Child Pornography CBI Raid: चाईल्ड पॉन्रोग्राफी केसमध्ये सीबीआयने मंगळवारी उत्तर प्रदेश, ओडिशासह 14 राज्यांतील 77 ठिकाणांवर छापा मारला होता. ओडिशामध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून स्थानिक भडकले. यानंतर त्यांनी सीबीआयच्या टीमवर हल्ला केला.

ओडिशाच्या ढेंकानालमध्ये सीबीआय टीमला मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. सीबीआयची टीम ऑनलाईन बालकांच्या लैंगिक शोषण प्रकरणी (Child Pornography) छापेमारी करण्यासाठी गेली होती. देशभरात 70 हून अधिक ठिकाणी हे छापे मारण्यात आले आहेत. यावेळी ढेंकानालमध्ये जमावाने सीबीआय टीमला मारहाण केली आहे. स्थानिक पोलिसांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना जमावाच्या तावडीतून सोडविले आहे. 

चाईल्ड पॉन्रोग्राफी केसमध्ये सीबीआयने मंगळवारी उत्तर प्रदेश, ओडिशासह 14 राज्यांतील 77 ठिकाणांवर छापा मारला होता. जालौन, मऊ सारख्या छोट्या जिल्ह्यांसह नोएडा, गाझियाबाद सारख्या मोठ्या शहरांत, नारौर, जयपूर, अजमेर ते तामिळनाडूच्या कोईंबतूर शहरांचा या छाप्यात समावेश आहे. सीबीआय टीमने ओडिशाच्या ढेंकनालमध्ये सकाळी 7 वाजता सुरेंद्र नायक याच्या घरी छापा मारला. सीबीआयची टीम दुपारपर्यंत चौकशी करत होती. या दरम्यान कोणत्यातरी गोष्टीवरून स्थानिक भडकले. यानंतर त्यांनी सीबीआयच्या टीमवर हल्ला केला.

देशातील वाढत्या चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या मुद्द्यावर सीबीआय अॅक्शन मोडमध्ये आली आहे. लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ बनवून शेअर केल्याप्रकरणी सीबीआय मंगळवारी सकाळपासून देशातील 76 ठिकाणी छापेमारी करत आहे. सीबीआय अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबर रोजी या प्रकरणी 83 आरोपींविरुद्ध 23 एफआयआर नोंदवण्यात आल्या होत्या. मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, ओडिशा, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये ही कारवाई करण्यात येत आहे.

लहान मुलांवरील सायबर गुन्ह्यांमध्ये 400% वाढनॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने अलीकडेच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये देशभरातील मुलांविरुद्ध होणाऱ्या सायबर गुन्ह्यांमध्ये 400% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. यापैकी बहुतेक प्रकरणे लैंगिक कृत्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामग्रीच्या प्रकाशन आणि प्रसारणाशी संबंधित आहेत.

यूपीमध्ये सर्वाधिक 170 प्रकरणे2020 च्या NCRB डेटानुसार, उत्तर प्रदेश(UP) मध्ये मुलांविरुद्ध ऑनलाइन गुन्ह्यांची सर्वाधिक 170 प्रकरणे नोंदवली गेली. त्यापाठोपाठ कर्नाटक आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. 144 आणि 137 केसेस येथे दाखल झाल्या आहेत. या यादीत केरळ (107) आणि ओडिशा (71) चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.  

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागOdishaओदिशा