शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वर्क फ्रॉम होम देण्याच्या नावाखाली देशातील तरुणांना करोडोंचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 17:00 IST

Cyber Crime : सुरुवातीला देशभरातून पोलिसांना सुमारे ६० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली सर्वांची फसवणूक झाल्याचा आरोप सर्व तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

नोकरी देण्यापूर्वी आरोपींनी या तरुणांकडून काही बनावट करार करून त्यावर सह्या घेतल्या. पुढे नोकरीच्या नावाखाली तरुणांना कामासाठी असे टार्गेट दिले गेले जे कधीच पूर्ण होऊ शकले नाहीत. काम न पूर्ण केल्याने झालेला करार दाखवून तरुणांकडून खंडणी उकळण्यात आली. न्यायालयाचा धाक दाखवून पैसे न भरणाऱ्यांकडून वसुली करण्यात आली. आतापर्यंत पाचशेहून अधिक तरुणांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या लोकांनी हजारो लोकांची फसवणूक केल्याची भीती व्यक्त होत आहे.सायबर सेलचे पोलीस उपायुक्त केपीएस गिल यांनी सांगितले की, नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल (एनसीआरपी) वर  फसवणूक झालेल्या अनेक तरुणांनी आपली तक्रार नोंदवली आहे. सुरुवातीला देशभरातून पोलिसांना सुमारे ६० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली सर्वांची फसवणूक झाल्याचा आरोप सर्व तक्रारींमध्ये करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.तपासादरम्यान आरोपींनी बनावट वेबसाइट तयार केल्याचे पोलिसांना समजले. या वेबसाइट्सच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या काम करून खूप कमाई करू शकता, असा दावा वेबसाइटवर करण्यात आला होता. तरुण त्यांच्या जाळ्यात येताच आरोपी त्यांना धमकावून पैसे उकळायचे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक सज्जन सिंग, एसआय धर्मेंद्र कुमार आणि इतरांची टीम तयार करण्यात आली.चार आरोपींना दिल्लीतील मोहन गार्डन आणि मायापुरी भागातून अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात या लोकांनी देशभरातील ५०० हून अधिक तरुणांना करोडोंचा गंडा घातल्याचं निष्पन्न झाले आहे. या लोकांनी देशभरातील हजारो तरुणांची फसवणूक केल्याचे मानले जात आहे. पोलीस त्यांच्या बँक खात्यांचा तपास करत आहेत.तपासादरम्यान रोहित कुमार हा टोळीचा म्होरक्या असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बनावट वेबसाइट तयार करून त्याने फसवणूक सुरू केली. त्यांनी बँक खात्यांची व्यवस्था केली. याशिवाय तो स्वत: टीम लीडर म्हणून बनावट कॉल सेंटर चालवत होता. अटक करण्यात आलेले उर्वरित तीन आरोपी हे टेलिकॉलर आहेत. या प्रकरणात आणखी काही लोक सामील असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.

 

कोविड पसरत असताना लॉकडाऊन दरम्यान, देशभरातील अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. अशा स्थितीत वर्क फ्रॉम होम करू लागले. याचा फायदा घेत आरोपींनी बनावट वेबसाइट तयार केली. जॉब प्लेसमेंट साइट्सवरून डेटा विकत घेऊन आरोपी त्या तरुणांशी संपर्क साधायचा. याशिवाय अनेकवेळा तरुण स्वतःहून त्यांच्या वेबसाइटवर येत असत.सुरुवातीला पीडितांकडे त्यांचे आधार, पॅनकार्ड आणि इतर कागदपत्रांची मागणी करण्यात आली. यानंतर ऑनलाइन बनावट फसवा करारनामा करण्यात आला. टार्गेटनुसार सर्व कामे करावी लागतात, असे आरोपी सांगत. टार्गेट पूर्ण न झाल्यास किरकोळ दंड भरावा लागेल. पुढे कामाच्या नावाखाली त्रस्त तरुणांना असे टार्गेट दिले गेले जे कधीच पूर्ण झाले नाही. यानंतर कोर्टाचा धाक दाखवून कराराच्या नावाखाली तरुणांकडून त्यांच्या खात्यात पाच ते दहा हजार, १५ ते २० हजार रुपये टाकायला सांगून पैसे उकळले.बनावट वकील आणि पोलीस कर्मचारी वापरण्यात आले...

जर कोणत्या तरुणाने आरोपींना दंड भरण्यास नकार दिला, तर आरोपी त्यांना बनावट वकील बनून फोन करायचे. त्यांना न्यायालयाच्या नोटिसांचा धाक दाखवण्यात येई. याशिवाय आरोपी पोलीस असल्याची बतावणी करून पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी धमकावायचे. अशा परिस्थितीत बहुतांश तरुण घाबरून आरोपींच्या खात्यात पैसे टाकायचे. अटक आरोपींची चौकशी करून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.बनावट पत्त्यांवर ज्यांनी आरोपींची बँक खाती आणि सिमकार्ड बनवले, त्यांचाही शोध घेतला जात आहे. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिसArrestअटकonlineऑनलाइन