शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

कर्नाळा बँक घोटाळा: विवेक पाटील यांच्या संस्थेत कोट्यवधींची रक्कम जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 7:48 AM

बाेगस खात्यांचा वापर. ईडीने मंगळवारी रात्री  पाटील यांना पनवेल येथील राहत्या घरातून अटक केली. त्यांना २५ जूनपर्यंत ईडी कोठडी मिळाली.

लोकमत न्यूज नेटमुंबई : कर्नाळा बँकेच्या कोट्यवधीच्या गैरव्यवहारात शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि माजी आ. विवेक पाटील यांचा मोठा वाटा असल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले. बनावट खात्यावर कर्ज मंजुरी देऊन ती रक्कम त्यांनी स्वतःच्या संस्थेच्या खात्यात वर्ग केली होती. त्यांच्यासह अनेका नेत्यांनी हा फंडा वापरून शेकडो कोटी उकळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ईडीने मंगळवारी रात्री  पाटील यांना पनवेल येथील राहत्या घरातून अटक केली. त्यांना २५ जूनपर्यंत ईडी कोठडी मिळाली. ईडी तपासातून अनेक बाबी समोर आल्या. पाटील यांनी बोगस खाते बनवून कोट्यवधीचे कर्ज दिल्याचे दाखवले. नंतर पैसे स्वत:च्या संस्थांच्या खात्यांत वळवले, कर्नाळा बँकेत सुमारे ५२९ कोटींचा घोटाळा झाला. २०१८ मध्ये बँकेच्या व्यवहारात अनियमितता असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आले होते. रिझर्व्ह बँकेने चौकशीसाठी अधिकारी नेमला. कर्नाळा बँक व्यवहाराबाबत चौकशीत धक्कादायक माहिती मिळालीबँकेत सुमारे ६० हजार खातेधारक आणि ठेवीदार आहेत. त्यांच्या शेकडो कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने ६३ व्यक्तींना संशयास्पदरीत्या कर्ज दिले हाेते. कर्ज घेणाऱ्याकडून तारण घेतलेले नव्हते. कर्ज मंजूर केलेल्या कागदपत्रांवर संचालक मंडळाच्या सह्यादेखील नव्हत्या. स्टॅम्प ड्यूटीही भरण्यात आलेली नव्हती. अशा अनेक त्रुटी होत्या....येथे वळवले पैसे६३ खात्यांवर दिलेले कर्ज हे दोन खात्यांवर वळवले होते. कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट या खात्यावर पैसे वळवले होते. या अकॅडमी आणि ट्रस्टचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष असलेले पाटील हेच आहेत. 

टॅग्स :fraudधोकेबाजीVivek Patilविवेक पाटील