शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने पोटात लपवले कोट्यवधींचे ड्रग्ज; मुंबईत एनसीबीने ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 20:34 IST

Drugs Case :एनसीबीन तिच्या जवळून ५३५ ग्रॅम वजनाच्या हेरॉईन ड्रग्जच्या ४९ कॅप्सूल, कोकेन ड्रग्जच्या १७५ ग्रॅम वजनाच्या १५ कॅप्सूल असा ड्रग्जसाठा जप्त केला आहे.

मुंबई : युगांडातील महिलेने पोटात लपवलेले ३ कोटींचे हेरॉईन आणि कोकेनसारखे घातक ड्रग्ज जप्त करण्यास अंमली पदार्थ नियंत्रण विभागाला (एनसीबी) (NCB) यश आले आहे. युगांडा ते मुंबई असा प्रवास करत असताना  छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली.

एनसीबीन तिच्या जवळून ५३५ ग्रॅम वजनाच्या हेरॉईन ड्रग्जच्या ४९ कॅप्सूल, कोकेन ड्रग्जच्या १७५ ग्रॅम वजनाच्या १५ कॅप्सूल असा ड्रग्जसाठा जप्त केला आहे. हे ड्रग्ज मुंबईत तस्करीसाठी येणार होते?  मात्र त्यापूर्वीच तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

एनसीबीचे विभागीय संचालक अमित घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. घावटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतराष्ट्रीय विमानतळावर २८ मे रोजी युगांडावरून मुंबईत आलेल्या महिलेला अडवले. एनसीबीच्या पथकाने तिच्या सामानाची कसून तपासणी केली असता त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. ती शरीर लपवत असल्याचे लक्षात येताच एनसीबीने तिच्याकडे सखोल चौकशी केली असता शरीरात सुमारे ११ प्रतिबंधित कॅप्सूल घेऊन जात असल्याचे तिने कबूल केले. वेगवेगळ्या चिकट पट्टीचा वापर करून १०  कॅप्सूल लपविण्यात आल्या होत्या. एनसीबीने कॅप्सूलमध्ये लपविलेले ११०  ग्रॅम हिरोईन जप्त केले.           

पुढे तिला सर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तिच्या पोटातून ड्रग्जने भरलेल्या  ५४  कॅप्सूल बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. यातील  ३९  कॅप्सूलमध्ये हेरॉईन आणि १५ कॅप्सूलमध्ये कोकेन होते.  एकूण ६४ कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत. आंतराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमती ३ कोटी रुपये आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवत महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच तिला अटक करण्यात आली. याप्रकरणी तिच्याकडे अधिक चौकशी सुरु आहे.

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोPoliceपोलिसJ. J. Hospitalजे. जे. रुग्णालयCrime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई