शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

खामल्यातील तरुणावर गुंडाचा प्राणघातक हल्ला, तरुण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 00:47 IST

 प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खामला वस्तीत गुंडांकडून नेहमीच हैदोस घातला जातो.

नागपूर - खामल्यातील गुंडांनी रोहित गोलानी नामक तरुणावर प्राणघातक हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या खामला वस्तीत गुंडांकडून नेहमीच हैदोस घातला जातो. हे गुंड एमडी आणि अन्य अंमली पदार्थांच्या तस्करीत आणि जुगारात गुंतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते गोलानी कुटुंबाच्या मागे लागले होते. पोलिसांकडे माहिती देत असल्याचा गुंडांना संशय होता. या संशयावरून यापूर्वीही या गुंडांनी गोलानी व त्याच्या आईला मारहाण केली होती. मात्र पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यामुळे निर्ढावलेल्या गुंडांनी शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास रोहित गोलानी याला भररस्त्यावर गाठून लोखंडी रॉड आणि शस्त्राने अमानुष मारहाण केली.त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. विशेष म्हणजे त्याची आई मुलाचा जीव वाचावा म्हणून आरोपींच्या हातपाय जोडत होती. मदतीसाठी आरडाओरड करीत होती. मात्र गुंडाच्या धाकामुळे कोणीही मायलेकाच्या मदतीला धावले नाही. रोहित गोलानी याला गंभीर अवस्थेत रस्त्यावर सोडून आरोपी पळून गेले. त्याच्या आईने आजूबाजूच्यांना हात पाय जोडून मदत मागितली आणि मध्यरात्री मुलाला रुग्णालयात पोहोचवले. त्याची प्रकृती गंभीर आहे. माहिती कळल्यानंतर प्रतापनगर पोलीस तेथे पोहोचले. वृत्त लिहिस्तोवर आरोपींची नावे स्पष्ट झाली नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर