शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

 नागपुरात  भरदिवसा गुन्हेगाराची हत्या  : २५ दिवसांपूर्वी झाला होता प्रेमविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 9:38 PM

यशोधरानगर येथील वीट भट्टी परिसरात साळ्याने मामाच्या मदतीने जावायाची हत्या केली. पोलीसांनी आरोपी साळ्यासोबतच चार नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. लॉकडाऊन दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे यशोधरानगर पोलीस ठाण्यात खळबळ माजली होती.

ठळक मुद्देसाळ्यासह चार आरोपी अटकेत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : यशोधरानगर येथील वीट भट्टी परिसरात साळ्याने मामाच्या मदतीने जावायाची हत्या केली. पोलीसांनी आरोपी साळ्यासोबतच चार नातेवाईकांना ताब्यात घेतले आहे. लॉकडाऊन दरम्यान घडलेल्या या घटनेमुळे यशोधरानगर पोलीस ठाण्यात खळबळ माजली होती. मृतकाचे नाव नितीन उर्फ छोटू काल्या कसोदिया (२२) आहे. तो धम्मदीपनगर येथील रहिवासी आहे.काल्या हा कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध खुणाचे १७ गुन्हे दाखल आहे. मृतकाची पत्नी धम्मदीपनगर परिसरातील रहिवासी आहे. दोघांचे घर जवळ जवळ होते. सुत्रांच्या मते काल्याने १ मार्चला पळुन जावून लग्न केले. त्यामुळे त्याच्या पत्नीचे नातेवाईक चिंतेत होते. काल्या ५ मार्च रोजी लग्न करून परतला. त्याने यशोधरानगर पोलीसांना सूचनाही दिली. काही दिवसापूर्वी काल्याच्या पत्नीला कुटुंबियांनी मामाची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगून घरी बोलाविले होते. त्यानंतर ती आपल्या कुटुंबासोबतच राहत होती.सुत्रांकडून सांगण्यात आले की, आज दुपारी ४ वाजता काल्याला त्याच्या साळ्याने बोलाविले. काल्या पत्नीच्या घरापासून काही अंतरावरच बसला होता. त्याचवेळी त्याचा साळा मामाला घेऊन चार ते पाच नातेवाईकासोबत पोहचला. तिथे काल्यासोबत वाद घातला. त्यांनी काल्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याला जखमी केले. घटनेची माहिती मिळाल्यावर यशोधरानगर पोलीस घटनास्थळी पोहचली. त्यांनी काल्याला रुग्णालयात पोहचविले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलीसांनी खुणाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आरोपी सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून