अभिनेता राहुल राज सिंगविरोधात फसवणुकीचा गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 03:12 PM2019-01-02T15:12:41+5:302019-01-02T15:14:55+5:30

हॉटेलचे सहा लाखांचे नुकसान झाले असल्याचे पोलिसांना माहिती देण्यात आली. याप्रकरणी पार्टीचा आयोजक असलेल्या राहुल सिंगविरोधात फसवणुकीचा गुन्हा सांताक्रुज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

Criminal crime against actor Rahul Raj Singh | अभिनेता राहुल राज सिंगविरोधात फसवणुकीचा गुन्हा 

अभिनेता राहुल राज सिंगविरोधात फसवणुकीचा गुन्हा 

ठळक मुद्देबॉलिवूडमधील गायकाचा परफॉर्मन्स न झाल्याने हॉटेलमध्ये तोडफोड केली.राहुल सिंगविरोधात फसवणुकीचा गुन्हा सांताक्रुज पोलीस ठाण्यात दाखल अभिनेता राहुल राज सिंगने जुहूतील एका हॉटेलात पार्टी आयोजित केली होती.

मुंबई - नवं वर्षानिमित्त मॉडेल आणि अभिनेता राहुल राज सिंगने जुहूतील एका हॉटेलात पार्टी आयोजित केली होती. त्यासाठी राहुलने ते हॉटेल बुक केले होते. मात्र त्याने आयोजित केलेल्या पार्टीतील लोकांनी नियोजनाप्रमाणे तसेच सांगितल्याप्रमाणे बॉलिवूडमधील गायकाचा परफॉर्मन्स न झाल्याने हॉटेलमध्ये तोडफोड केली. त्यानंतर हॉटेलमधून सांताक्रुज पोलिसांना फोन आला आणि त्यांनी याबाबत पोलिसांना कळविले. हॉटेलचे सहा लाखांचे नुकसान झाले असल्याचे पोलिसांना माहिती देण्यात आली. याप्रकरणी पार्टीचा आयोजक असलेल्या राहुल सिंगविरोधात फसवणुकीचा गुन्हा सांताक्रुज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. 

३१ डिसेंबरच्या रात्री १२. ३० वाजेपर्यंत जुहूतील एका हॉटेलमध्ये राहुलने पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत सामील होण्यासाठी काही लोकांनी पैसे माजून पास विकत घेतले होते. मात्र, या लोकांची हॉटेलात पोचल्यावर पुरती निराशा झाली. कारण पासवर नमूद केलेल्या सोयी- सुविधांचा अभाव होता. तसेच बॉलिवूड गायकाचा परफॉर्मन्स देखील नसल्याने भडकलेल्या गर्दीने हॉटेलमध्ये तोडफोड केली. याप्रकरणी सांताक्रुज पोलीस ठाण्यात राहुलविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बालिका वधू फेम प्रत्युषा बॅनर्जी हत्याकांडात देखील तिचा बॉयफ्रेंड असलेल्या राहुल सिंगचं नाव गोवण्यात आलं होतं. 

Web Title: Criminal crime against actor Rahul Raj Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.