शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगाराचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 22:44 IST

रेकॉर्डवरील आरोपीने ठाण्यात येऊन स्वत:च धारदार पट्टीने हातावर सपासप वार करुन उपचाराच्या १० गोळ्या सेवन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली.

जळगाव  - पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या सागर महारु सपकाळे (२९, रा.प्रजापत नगर) याने रविवारी दुपारी साडे तीन वाजता शनी पेठ पोलीस ठाण्यात येऊन स्वत:च धारदार पट्टीने हातावर सपासप वार करुन उपचाराच्या १० गोळ्या सेवन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान, यावेळी पोलीस ठाण्यात एकच धावपळ उडाली होती. सपकाळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. रविवारी दुपारी पावणे तीन वाजता तो शनी पेठ पोलीस ठाण्यात आला असता सिध्दार्थ बैसाणे हे ठाणे अमलदार म्हणून कार्यरत होते तर सहायक फौजदार किरण पाठक, धनंजय येवले, संदीप माने, रमेश येउलकर, होमगार्ड सर्फराज पिंजारी व सुजाता ठाकूर असे पोलीस ठाण्यात हजर असताना सागर याने सिध्दार्थ बैसाणे यांच्याकडे पैशाची मागणी केली, पैसे दिले नाहीत तर मी माझ्या हातापायास पट्टी मारुन घेईल व तुमचे नाव कोर्टात तसेच वरिष्ठ अधिकाºयांना सांगेल असे धमकावू लागला. यावेळी बैसाणे व इतर सहकाºयांनी त्याची समजूत घालून घरी रवाना केले. त्यानंतर तो पुन्हा साडे तीन वाजता आला व पैसे देत नसल्याने औषधोपचाराच्या ८ ते १० गोळ्या सेवन करुन धारदार पट्टीने स्वत:च्या हातावर पट्टीने वार केले. यावेळी प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने कर्मचाºयांची एकच धावपळ उडाली. उपचारास दिला नकारदरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात नेले, मात्र त्याने तेथे उपचारास व दाखल होण्यास नकार दिला. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. सिध्दार्थ बैसाणे यांच्या फिर्यादीवरुन सागर याच्याविरुध्द आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सागर हा सराईत गुन्हेगार असून त्याने याआधी देखील पोलीस ठाण्यात येऊन कर्मचाºयांकडे पैशाची मागणी केली आहे, पैसे दिले नाहीत तर स्वत:च्या अंगावर वार केलेले आहेत. दोन दिवसापूर्वी देखील त्याने पोलीस ठाण्यात येऊन असाच प्रकार केला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव