शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तीकारासह तीन मंडळाच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 15:48 IST

Crime News : रथ चौकातील श्रीराम तरुण सांस्कृतिक मित्र मंडळ, सराफ बाजारातील साईनाथ तरुण मित्र मंडळ व सागर पार्कसमोरील श्रीमंत रामशेठ चौबे परिवार गणेश मंडळाचा त्यात समावेश आहे.

ठळक मुद्देकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने यंदा देखील मिरवणूकांवर बंदी घालून सार्वजनिक मंडळांसाठी चार फुट तर घरगुतीसाठी २ फुट उंचीची मूर्ती स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत.शासनाच्या नियमाबाबत पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या आदेशाने सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना तसेच मूर्तीकारांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली होती, तरी देखील नियमांचे उल्लंघन झाले.

जळगाव : शासनाने ठरवून दिलेल्या नियमापेक्षा जास्त मोठी मूर्ती तयार केली व त्या मुर्तीची स्थापना केली म्हणून पुन्हा तीन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरुध्द वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून मुर्तीकारालाही त्यात आरोपी करण्यात आले आहे. दोन दिवसात मुर्तीकाराविरुध्द चार गुन्हे दाखल झाले आहेत. रथ चौकातील श्रीराम तरुण सांस्कृतिक मित्र मंडळ, सराफ बाजारातील साईनाथ तरुण मित्र मंडळ व सागर पार्कसमोरील श्रीमंत रामशेठ चौबे परिवार गणेश मंडळाचा त्यात समावेश आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाने यंदा देखील मिरवणूकांवर बंदी घालून सार्वजनिक मंडळांसाठी चार फुट तर घरगुतीसाठी २ फुट उंचीची मूर्ती स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत. या नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. असे असतानाही रिंगरोडवरील एलआयसी कॉलनीतील राजेंद्र राणा यांना सात फूट उंचीची मूर्ती तयार केली.

रथ चौकातील श्रीराम तरुण सांस्कृतिक मित्र मंडळाचे अध्यक्ष जीवन पुंडलिक तायडे व उपाध्यक्ष राहूल दादू मिस्तरी (दोन्ही रा.कोळी पेठ), सराफ बाजारातील साईनाथ तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष भोजराज मानसिंग राजपूत (रा.मारवाडी व्यायाम शाळेजवळ), चेतन दिलीप तिवारी (रा.डेमला कॉलनी), मुर्तीकार राजेंद्र चंदुलाल राणा (रा.रिंग रोड) यांच्याविरुध्द शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गोपनीयचे पोलीस कर्मचारी गिरीश पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

मूर्तीकार राजेंद्र चंदुलाल राणा (रा.रिंग रोड) यांनी चार फुटापेक्षा जास्त उंचीची मूर्ती बनवून श्रीमंत रामशेठ चौबे परिवार गणेश मंडळ, सागर पार्क समोर यांना विक्री करुन शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले.याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल असून पोलीस कर्मचारी उमेश पाटील यांनी सरकारकडून फिर्याद दिली आहे. पहिल्याच दिवशी बळीराम पेठेतील आझाद क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह मूर्तीकाराविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, शासनाच्या नियमाबाबत पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या आदेशाने सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना तसेच मूर्तीकारांना सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली होती, तरी देखील नियमांचे उल्लंघन झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगावPoliceपोलिसGanesh Mahotsavगणेशोत्सवCorona vaccineकोरोनाची लस