शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'बर्थडे सेलिब्रेशन'भोवले; खेड तालुक्यात महिला उपसरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 13:01 IST

सोशल मीडियावर वाढदिवसाचे सेलिब्रेशनचे फोटो, व्हिडिओ केले व्हायरल

ठळक मुद्देग्रामपंचायतीच्या उपसरपंच महिलेने केलेल्या वाढदिवस गावात चर्चेचा विषय

राजगुरुनगर: पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना  नागरिकांसह लोकप्रतिनिधींना मात्र अजून परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे चित्र उघड करणारी एक घटना खेड तालुक्यात समोर आली आहे. शिरोली या गावात कंटेन्मेंट झोन जाहिर करण्यात आला आहे. तसेच ह्या गावात सध्या कोरोनाचे दहा रुग्ण आहे. मात्र, अशा  परिस्थितीत सुद्धा गावातील महिला उपसरपंचाने सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवून ग्रामपंचायत कार्यालयात वाढदिवस साजरा केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

जया काळूराम दसगुडे असे या उपसरपंच महिलेचे नाव आहे.त्यांच्या विरुद्ध खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित महिला उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सहकारी पण विरोधक असलेल्या माजी उपसरपंचासह ६ सदस्यांनी या महिला उपसरपंचा विरुद्ध  गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच १८८ कलम अंतर्गत त्यांच्यावर खटला आला असल्याचे पोलिस हवालदार बापुसाहेब थिटे यांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोली गावच्या उपसरपंच महिलेने सोशल डिस्टन्सचे नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.विशेष म्हणजे या वाढदिवस कार्यक्रमात ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुध्दा सहभागी झाले होते. गावात कोरोनाची लागण झालेले १० रुग्ण  झाल्याने भीतीदायक वातावरण होते.अशातच उपसरपंच दसगुडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात त्यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला.त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यात काहींनी मास्क घातलेला तर काहींनी ना घालताच उपस्थिती लावल्याचे समोर आले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा वाढदिवस साजरा केल्यानंतर माजी उपसरपंच जितेंद्र वाडेकर, सदस्य गणपत थिगळे,विजय सावंत,संदीप वाडेकर, सोनल सावंत , उर्मिला सावंत यांनी गटविकास अधिकारी जोशी यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना नियमावली लागु असताना जबाबदार पदाधिकारी असलेल्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच महिलेने केलेल्या वाढदिवस गावात चर्चेचा विषय बनला आहे.

टॅग्स :KhedखेडWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसgram panchayatग्राम पंचायत