शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात अडथळा आणणाऱ्या '''राष्ट्रवादी '' च्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 16:52 IST

मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना आरोपींनी बेकायदा गर्दी जमाव जमवली.

ठळक मुद्देशहराध्यक्षासह पाच ते सहा कार्यकर्त्यां विरोधात तक्रार 

बारामती : शहरात नुकत्याच पार पडलेल्या  भाजपच्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या भाषण अडथळा आणुन घोषणाबाजी केल्याप्रकरणी  बारामती शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्षांसह पाच ते सहा कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल ओंकार कैलास सिताप यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यानुसार  बारामती शहरचे राष्टवादी काँग्रेस युवक पार्टी अध्यक्ष अमर धुमाळ, सागर खलाटे ( दोघे रा.बारामती ता बारामती जि.पुणे) यांच्यासह तसेच राष्टवादी कॉंग्रेस युवक पक्षाचे पाच ते सहा अनोळखी कार्येकर्त्यांवर गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना आरोपींनी बेकायदा गर्दी जमाव जमवली. मुख्यमंत्र्यांचे  भाषण सुरु असताना त्यांचे भाषणात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.त्या उददेशाने एकच वादा अजित दादा अशा मोठमोठयाने घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचे फियार्दीमध्ये नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार  करीत आहेत. दरम्यान शनिवारी(दि १४) पार पडलेल्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सकाळपासुनच तणावाचे वातारवरण होते. डिजे साऊंड सिस्टिम वरून देखील राष्ट्रवादीच्या आणि भाजपमध्ये वाद झाला. यावेळी महाजनादेश यात्रेसाठी लावलेली  डीजे साऊंड सिस्टिम बंद करण्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना भाग पाडले होते. तसेच,  मुख्यमंत्र्यांचा प्रवेश बारामती एमआयडीसीसह शहरात होताच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत मुख्यमंत्र्यांचा  निषेध व्यक्त केला. कोण आला रे कोण आला नागपूरचा चोर आला , एकच वादा अजित दादा अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. तसेच शहरात देखील भाषण सुरु असताना  राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत अडथळा आणला होता. त्यामुळे  शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.तसेच  मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेत हम मोदीजी के बाशिंदे है,हमारी आवाज कोई बंद नही कर सकता,अशा शब्दात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर दिले होते.शिवाय रविवारी(दि १५)  पुणे शहरात झालेल्या पत्रकार परीषदेत बारामतीत ३७० कलम लागू केले की काय, असा सवाल केला होता.अखेर याप्रकरणी आता राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.——————————————————

टॅग्स :BaramatiबारामतीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस