चंद्रावर जमीन घेणाऱ्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 16:03 IST2022-04-23T16:02:58+5:302022-04-23T16:03:39+5:30

चंद्रावर जमीन घेणारे राम वाधवा यांच्यासह तिघांवर ७७० चौ. फुटाची जागा परस्पर विक्री केल्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

crime of fraud against land acquisition on the moon | चंद्रावर जमीन घेणाऱ्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा

चंद्रावर जमीन घेणाऱ्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा

सदानंद नाईक

उल्हासनगर : चंद्रावर जमीन घेणारे राम वाधवा यांच्यासह तिघांवर ७७० चौ. फुटाची जागा परस्पर विक्री केल्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून राजकीय हेतूने गुन्हा दाखल केल्याची प्रतिक्रिया राम वाधवा यांनी पत्रकारांना दिली.

 उल्हासनगरातील राम वाधवा यांनी थेट चंद्रावर जमीन विकत घेतल्याने ते चर्चेत आले आहे. १५ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२२ दरम्यान भरत रोहरा, अजीज शेख व राम वाधवा यांनी संगनमताने कॅम्प नं-४ ओटी सेक्शन परिसरातील ७७० चौ. मीटर जागेचे बनावट कागदपत्राच्या आधारे राजेश तलरेजा परस्पर विक्री केली. तसेच त्यांच्याकडून सन २०१८९ मध्ये ५० हजाराचे टोकण घेऊन फसवणुक केली. अशी तक्रार जागेचे मालक परमानंद माखिजा यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात केली. माखिजा यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिसांनी भरत रोहरा, अजीज अमीर शेख व राम वाधवा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

 थेट चंद्रावर जागा विकत घेतल्या प्रकरणी राम वाधवा यांच्यासह तिघा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकारने एकच खळबळ उडालीय. याप्रकरणी राम वाधवा यांनी राजकीय हेतूने आपल्यावर गुन्हा दाखल झाला. आदी प्रतिक्रिया पत्रकारांना दिली. अधिक तपास पोलीस कर्मचारी करीत आहेत.
 

Web Title: crime of fraud against land acquisition on the moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.