शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

सैराटची पुनरावृत्ती! प्रेमप्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या; 'असा' रचला भयंकर कट, घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 10:07 IST

Crime News : प्रेमप्रकरणातून मुलीच्या कुटुंबीयांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. बेदम मारहाण करून तरुणाची हत्या केली आहे.

नवी दिल्ली - नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सैराटची पुनरावृत्ती झाली आहे. प्रेमप्रकरणातून मुलीच्या कुटुंबीयांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. बेदम मारहाण करून तरुणाची हत्या केली आहे. हरियाणामध्ये ही भयंकर घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तापस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील सोनिपतमध्ये राहणाऱ्या बिजेंद्रचं एका मुलीवर प्रेम होतं. त्यांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. मात्र घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. त्यामुळेच दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. 

मुलगी घरातून पळून जाणार असल्याची माहिती कुटुंबीयांना समजल्यावर त्यांनी मुलाचाच काटा काढण्याचा निर्णय घेतला. मुलाच्या हत्येचा कट रचला. सुरुवातीला मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाचा अपघात झाल्याचा बनाव रचला. मात्र तरुणाच्या नातेवाईकांनी ही हत्याच असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तरुणाच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, बिजेंद्रचं गावातील एका मुलीवर प्रेम होतं. त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं. पण मुलीच्या कुटुंबीयांना हे मान्य नव्हतं. त्यामुळेच त्यांनी बिजेंद्रची हत्या केली आहे. 

प्रेमाला विरोध करत मुलीच्या कुटुंबीयांनी उचललं टोकाचं पाऊल

सुरुवातीला आरोपींनी फोन करून बिजेंद्रच्या भावाला फोन करून 20 हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार भाऊ सांगितलेल्या पत्त्यावर पैसे घेऊन पोहोचला पण तिथे बिजेंद्र सापडलाच नाही. परिसरात त्याचा शोध घेण्यात आला पण काहीच माहिती मिळाली नाही. त्यानंतर आरोपींनी पुन्हा फोन करून तरुणाला गोहाना येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती दिला. बिजेंद्रचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांना त्याचा मृतदेह  मिळाला. बिजेंद्रच्या भावाने त्याची हत्या करून त्याला रुग्णालयात सोडल्याचं म्हटलं आहे. 

शरीरावर मारहाणीच्या असंख्य जखमा

बिजेंद्रच्या शरीरावर मारहाणीच्या असंख्य जखमा पाहायला मिळत आहेत. आरोपींनी हत्या केल्यानंतर रुग्णालयात मात्र अपघात झाल्याचं सांगितलं. उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. कुटुंबीयांनी ही हत्याच असल्याचं म्हणत मुलीच्या घरच्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेने परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे. तरुणाच्या कुटुंबीयांना यामुळे मानसिक धक्का बसला आहे. पोलीस याप्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस