शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! पत्नीचा माहेरी जाण्याचा हट्ट मुलाच्या जीवावर बेतला; पित्याने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 15:30 IST

Crime News : जन्मदात्या पित्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. रागाच्या भरात त्याने आपल्या 13 महिन्यांच्या मुलाला नदीत फेकून दिल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - बिहारच्या (Bihar) बेगूसरायमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नीचा माहेरी जाण्याचा हट्ट मुलाच्या जीवावर बेतला आहे. जन्मदात्या पित्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. रागाच्या भरात त्याने आपल्या 13 महिन्यांच्या मुलाला नदीत फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. भगवानपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बनवारीपूर गावात ही संतापजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनीष कुमार नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलाला नदीत फेकून दिलं. त्यानंतर मुलाचा बुडून मृत्यू झाला. 

पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. पोस्टमॉर्टमनंतर मुलाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. बनवारी पूर गावातील रहिवासी मनीष चौरसिया याचा पत्नी कांचन देवीसोबत तिच्या माहेरी जाण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर आरोपीने रागात आपला 13 महिन्यांचा मुलगा शिवम कुमार याला घराजवळ असलेल्या बलान नदीमध्ये फेकून दिलं. त्यात पाण्यात बुडून शिवमचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी वडील मनीष चौरसियाला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

मुलाची आई कांचन देवीने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी ती तिच्या माहेरी जाण्याच्या तयारीत होती. यानंतर दारूच्या नशेत तेथे पोहोचलेल्या पतीने तिला जाण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर तिचा पती रागावला आणि मुलासह निघून गेला. काही वेळाने तिने पतीला मुलाबद्दल विचारले असता, तो बोटीवर फिरत असल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर बोटीवर शोध घेऊनही शिवम कुठेच सापडला नाही, तेव्हा संशय आला. 

आजूबाजूच्या लोकांसह मुलाचा शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आला. लोकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. त्यानंतर कठोर चौकशी केली असता त्याने मुलाला नदीत फेकून दिल्याचं सांगितले. आरोपी आणि कांचन देवी यांचा विवाह सात वर्षांपूर्वी झाल्याचं सांगण्यात येत आहे. ज्याच्यापासून त्यांना तीन मुले आहेत. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस