शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Crime News: कुर्ला येथे तरुणीची बलात्कार करून हत्या; दोघा आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 07:11 IST

Crime News: कुर्ला येथील एचडीआयएलच्या बंद इमारतीत २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने शनिवारी खळबळ उडाली. बलात्कारानंतर तिची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.

मुंबई : कुर्ला येथील एचडीआयएलच्या बंद इमारतीत २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने शनिवारी खळबळ उडाली. बलात्कारानंतर तिची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे.

कुर्ला येथील एचडीआयएल कंपाउंडमधील बंद इमारतीच्या १३ व्या मजल्यावर तीन तरुण इन्स्टाग्राम व्हिडीओ शूट करण्यासाठी गेले असताना तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षात दुरध्वनी करून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच विनोबा भावे नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणीच्या डोक्यावर मारहाणीच्या गंभीर खुणाही आढळून आल्या आहेत. तसेच मृतदेहही कुजल्याचे दिसून आले.

पोलिसांनी तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. प्राथमिक तपासात बलात्कारानंतर तिची हत्या केल्याच्या संशयातून पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविला. परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने काही हाती लागते का, यासाठी एका पथकाने प्रयत्न केले. विविध पोलीस ठाण्यात दाखल हरवलेल्या मुलींच्या माहितीवरून मृत तरुणीची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू असताना ती गोवंडी येथील राहणारी असल्याचे आढळले. या घटनेचा गुन्हे शाखाही समांतर तपास करत आहेत.

या  गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना केल्याचे परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातून अत्याचार झाल्याचे समोर आले असून त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दोघा अटक आरोपींची कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

हत्येमागे प्रेमप्रकरण असल्याचा संशयमृत तरुणी १८ वर्षांची असून गोवंडीतील रहिवासी आहे. तिचे यातील १८ वर्षीय अटक आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. ती त्याच्यामागे सतत लग्नाचा तगादा लावत असल्याने त्याने मित्राच्या मदतीने तिच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर येत आहे. २३ नोव्हेंबर रोजी त्याने तिला भेटण्याच्या बहाण्याने कुर्ला एचडीआयएल येथे बोलावून तिची हत्या केल्याचे आढळत आहे. दोन्ही आरोपी १८ ते २० वयोगटातील आहे. त्यांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केले का, याबाबत पथक अधिक तपास करत आहे.

गेल्या ९ महिन्यांत ६९५ बलात्काराच्या घटनागेल्या ९ महिन्यांत मुंबईत बलात्काराच्या ६९५ घटनांची नोंद मुंबई पोलिसांच्या दफ्तरी झाली आहे. यापैकी ५९३ घटनांची उकल झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलीसंदर्भात सर्वाधिक ४०८ घटनांचा यात समावेश आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई