Crime News: पत्नीच्या फेसबुक फ्रेंडला मोठ्या आवेशात समजवायला गेला; पुढे जे झाले, विचारही केला नव्हता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 15:52 IST2021-11-08T15:51:15+5:302021-11-08T15:52:26+5:30

फेसबुक फ्रेंड चॅटिंग नंतर महिलेशी मोबाईलवर तासंतास बोलू लागला होता. सुरुवातीला महिलेला त्याच्याशी गप्पा मारणे चांगले वाटू लागले, पण नंतर तिला त्याचा कंटाळा येऊ लागला. यामुळे या महिलेला त्या तरुणापासून पिच्छा सोडवायचा होता.

Crime News: wife's Facebook friend attacked Husband; Two teeth broken in Delhi | Crime News: पत्नीच्या फेसबुक फ्रेंडला मोठ्या आवेशात समजवायला गेला; पुढे जे झाले, विचारही केला नव्हता

Crime News: पत्नीच्या फेसबुक फ्रेंडला मोठ्या आवेशात समजवायला गेला; पुढे जे झाले, विचारही केला नव्हता

फेसबुक फ्रेंड चॅटिंग नंतर महिलेशी मोबाईलवर तासंतास बोलू लागला होता. सुरुवातीला महिलेला त्याच्याशी गप्पा मारणे चांगले वाटू लागले, पण नंतर तिला त्याचा कंटाळा येऊ लागला. यामुळे या महिलेला त्या तरुणापासून पिच्छा सोडवायचा होता. पण तो तयार नव्हता. यामुळे महिलेने पतीला याची माहिती दिली. पतीनेही त्याला फोनवर समजाविण्याचा प्रयत्न केला परंतू तो ऐकत नव्हता. यामुळे पतीने थेट त्याचे घर गाठले. 

दिल्लीच्या भजनपुरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 48 वर्षीय प्रमोद कुमार हे आपल्या कुटुंबासह भजनपूरा भागात राहतात. ते मुलांची शिकवणी घेतात. त्यांच्या पत्नीची ओळख सोशल मीडियावर भरत तोमर नावाच्या तरुणाशी झाली. तो देखीय याच भागात राहतो. सुरुवातीला फेसबुक चॅटिंग सुरु होते, हळू हळू त्यांनी एकमेकांना मोबाईल नंबर दिले आणि बोलू लागले. यानंतर तोमर सारखे सारखे फोन करू लागला. याला प्रमोद यांची पत्नी वैतागली. तो पिच्छा सोडायला तयार नसल्याने तिने अखेर पतीच्या कानावर झाला प्रकार घातला. पतीनेही त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतू तो मानायला तयार नव्हता. 

यामुळे पतीने त्याची तक्रार त्याच्या घरच्यांकडे करण्याचा निर्णय घेतला. प्रमोद कुमार त्या तोमरच्या घरीदेखील पोहोचले. परंतू तोमरने प्रमोद कुमार यांच्यावर हल्ला केला आणि दोन दात तोडले. पोलिसांनी प्रमोद यांच्या तक्रारीवरून तोमरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद कुमार त्याच्या घरी जाण्याआधीच त्याने त्यांना गल्लीत रोखले होते. यावेळी दोघांमध्ये वादावादी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

भरत तोमरने प्रमोद यांना लाथा बुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात त्याचे दात तुटले. यानंतर तोमर तेथून फरार झाला. पोलिसांना कळताच घटनास्थळी गेल्यावर जखमी झालेल्या प्रमोद यांना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. 

Web Title: Crime News: wife's Facebook friend attacked Husband; Two teeth broken in Delhi

टॅग्स :delhiदिल्ली