शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : मधुचंद्राच्या रात्री पत्नी बघत होती वाट,पती तिच्याच बहिणीला घेऊन झाला पसार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:24 IST

लग्नाच्या पहिल्याच रात्री या तरुणीसोबत असं काही घडलं की,तिला आयुष्यभरासाठी मोठा धक्का बसला आहे.

लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला खास क्षण असतो. लग्नानंतरची पहिली रात्र अर्थात मधुचंद्राच्या रात्री तिच्या आयुष्याची नवी सुरुवात होत असते. मात्र, याच दिवशी एका तरुणीला इतका मोठा धक्का बसला की, तिचा लग्न आणि प्रेमावरून विश्वासच उडाला आहे. हा धोका तिच्या पतीनेच दिला असल्याने, ती आणखीनच हादरून गेली आहे. ही धक्कादायक घटना ऑस्ट्रेलियामध्ये घडली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये राहणारी कायली नामक तरुणी आपल्या लग्नाची आणि मधुचंद्राची स्वप्न रंगवत होती, त्याचवेळी तिच्यासमोर धक्कादायक सत्य आले. 

कायलीने ऑस्ट्रेलियाचा रेडिओ शो 'लेट ड्राईव्ह विथ बेन, लियाम अँड बेले'मध्ये आपबिती सांगितली. लग्नाच्या पहिल्याच रात्री बॉयफ्रेंड घरातून पळून गेला, तेव्हा तिच्यावर काय परिस्थिती बेतली होती, याचा खुलासा तिने यावेळी केला. 

२४ तासही नाही टिकलं लग्न!आपल्या आयुष्यातील ही घटना सांगताना कायली म्हणाली की, "माझं लग्न २४ तासही टिकलं नाही. आमचं लग्न एका भव्यदिव्य समारंभात झालं होतं. माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं. लग्नाच्या दिवशी आम्ही खूप फोटो काढले. सहा वर्षांच्या नात्यानंतर आम्ही आमच्या आयुष्यात एक पाऊल पुढे टाकलं होतं. मात्र, रिसेप्शनच्यानंतर अचानक माझा नवरा गायब झाला."

नेमकं काय झालं आणि आपला पती कुठे गेला, याची कायलीला अजिबातच कल्पना नव्हती. ती संपूर्ण रात्र कायलीने एकटी बसून त्याची वाट बघितली. कायलीने आपल्या पतीला फोन केला, मेसेजही केले. पण, त्याच्याकडून काहीच उत्तर आलं नाही. लग्नासाठी जमलेले सगळे नातेवाईक त्याच्याबद्दल विचारणा करत होते. तर, उत्तर देताना कायली मात्र गोंधळून गेलेली. या गोष्टीला काही महिने उलटल्यावर कायलीच्या समोर आपल्या पतीचं सत्य आलं, जे कळल्यावर तिला मोठा धक्का बसला. 

पत्नीच्या बहिणीसोबत गेला पळून!

कायली म्हणाली की, तिच्यासोबत नात्यात असताना देखील तिचा पती दुसऱ्या महिलेला डेट करत होता. ही महिला दुसरी कुणी नसून आपलीच चुलत बहीण असल्याचे कळताच कायलीच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर कायलीने पतीला घटस्फोट दिला. मात्र, आता लग्नाची भीती आयुष्यभरासाठी मनात बसल्याचे ती सांगते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीयAustraliaआॅस्ट्रेलिया