शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पतीसोबत झोपणार कोण? दोन पत्नींमध्ये रोज व्हायची भांडणं, अखेर वाद विकोपाला गेला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 17:39 IST

Crime News: छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यामध्ये एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र या महिलेने शिताफीने तलावात उडी मारून स्वत:चे प्राण वाचवले.

रायपूर - छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यामध्ये एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र या महिलेने शिताफीने तलावात उडी मारून स्वत:चे प्राण वाचवले. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये या महिलेला आग लावणारी व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नाही तर त्या महिलेचा पती आणि त्याची दुसरी पत्नी म्हणजे पीडित महिलेची सवत होती. या घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार आहेत. तसेच पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी पीडिता आणि आरोपींशी संबंधित लोकांकडे चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कांकेर येथील पखांजूर येथील कापसी पीव्ही-७ येथे ही धक्कादायक घटना घडली.  पीव्ही-७ येथील उज्ज्वल मंडल याचा सुमारे १७ वर्षांपूर्वी सविता मंडल हिच्याशी विवाह झाला होता. दोघांचीही दोन मुलेही आहेत. दोघांच्या नात्यामध्ये १५ वर्षांपर्यंत सारे काही ठीक होते. मात्र दोन वर्षांपूर्वी उज्ज्वलच्या संपर्कात महाराष्ट्रातील जेबा मंडल आली. दोघेही प्रेमात पडले. त्यानंतर उज्ज्वलने तिच्याशी लग्न केले. मग हा उज्ज्वल दोन्ही पत्नींसोबत एकाच घरात राहू लागला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही पत्नींमध्ये रात्री पतीसोबत झोपायचं कोण, यावरून रोज भांडण व्हायचे. त्यात गेल्या २८ मार्च रोजी रात्री सविता पतीसोबत झोपण्यासाठी अंथरूण घालत होती. तेव्हा दुसरी पत्नी असलेल्या जेबा हिने त्याला विरोध केला. वाद खूप वाढला. तेवढ्यात तिथे सासू पोहोचली. तिने सुनांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात उज्ज्वलही तिथे पोहोचला. त्याने दुसऱ्या पत्नीची बाजू घेत पहिली पत्नी सविता हिला खडसावण्यास सुरुवात केली. उज्ज्वल आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीने घरातून रॉकेल आणून सविताच्या अंगावर ओतले. त्या पेटलेल्या अवस्थेर सविताने जवळच्या तलावात उडी मारली. सध्या गंभीर जखमी असलेल्या सवितावर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारChhattisgarhछत्तीसगड