शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: फेसबूकवर हवे होते फॉलोअर्स, पतीने पत्नीचे शेअर केले असे फोटो, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 11:11 IST

Crime News: फेसबुकचं व्यसन आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठीच्या हट्टाने एका तरुणाने अत्यंत धक्कादायक पाऊल उचललं आहे. त्याने पत्नीचे आंघोळ करतानाचे फोटो फेसबुकवर अपलोड केले.

फिरोजाबाद - फेसबुकचं व्यसन अनेकांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ घडवून आणत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार फिरोझाबादमधून समोर आला आहे. फेसबुकचं व्यसन आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठीच्या हट्टाने एका तरुणाने अत्यंत धक्कादायक पाऊल उचललं आहे. त्याने पत्नीचे आंघोळ करतानाचे फोटो फेसबुकवर अपलोड केले. पत्नीला या प्रकाराची माहिती मिळाली तेव्हा पतीच्या या कृत्यामुळे ती संतप्त झाली. त्यानंतर तिने पोलीस ठाणे गाठत पतीविरोधात गुन्हा दाखल केला. आता पोलिसांनी सदर तरुणाचं फेसबुक अकाऊंट डिलीट केलं आहे. 

हे प्रकरण फिरोजाबादमधून समोर आले आहे. एका २६ वर्षीय महिलेने त्याच्या २८ वर्षीय पतीविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तिने पतीवर आरोप केला की, त्याने फेसबुकवर महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ अपलोड केला. महिलेने सांगितले की, तिचा पती दिल्लीतील उत्तम नगरमध्ये राहतो. तो सर्कशीत काम करतो. यादरम्यान एकदा त्याने व्हिडीओ कॉलवर पत्नीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. त्यानंतर तो फेसबुकवर अपलोड केला.  

दरम्यान, पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सर्वप्रथम त्या तरुणाचं अकाउंट डिलीट केलं. तसेच पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात गुन्हाही दाखल केला. दरम्यान, पीडित महिलेने सांगितले की, तिचा पती सोशल मीडिया अॅडिक्ट आहे. तो सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी या पातळीपर्यंत जाईल, असं मला वाटलंही नव्हतं. महिलेने सांगितले की, जेव्हा मी माझे अश्लील फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहिले तेव्हा मला धक्का बसला. मी त्याला हे फोटो डिलीट कऱण्यास सांगितले. मात्र त्याने नकार दिला. त्यामुळे नाईलाजास्तव मला पोलिसांकडे गुन्हा दाखल करावा  लागला. दरम्यान, आपल्या पतीविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पत्नीने केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारSocial Mediaसोशल मीडिया