शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: ट्रेनमधून होणाऱ्या पतीला केला व्हिडीयो कॉल, त्यानंतर ट्रॅकवर संशयास्पद स्थितीत सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 12:09 IST

Crime News: छत्तीसगडमधील कोरबा येथे एका तरुणीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकच्या शेजारी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणीने तिच्या होणाऱ्या पतीला ट्रेनमधून शेवटचा व्हिडीओ कॉल केला होता. त्यानंतर काही काळाने तिचा मृतदेह ट्रॅकच्या बाजूला सापडला.

रायपूर - छत्तीसगडमधील कोरबा येथे एका तरुणीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकच्या शेजारी सापडल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणीने तिच्या होणाऱ्या पतीला ट्रेनमधून शेवटचा व्हिडीओ कॉल केला होता. त्यानंतर काही काळाने तिचा मृतदेह ट्रॅकच्या बाजूला सापडला. तिने ट्रेनमधून उडी मारून आत्महत्या केली. पुढच्या महिन्यातच या तरुणीचा विवाह होणार होता. दरम्यान, तिच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

पोलिसांनी मृत तरुणीची ओळख अन्नपूर्णा पटेल अशी पटवली आहे. तसेच तिचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला आहे. रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या तरुणीच्या मृतदेहाच्या डोक्यावर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे फॉरेन्सिक तज्ज्ञांन घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तसेच रेल्वेतून निघालेली ही तरुणी घरी न पोहोचल्याने त्याची माहिती नातेवाईकांसह आसपासच्या रेल्वे स्टेशनमध्ये दिली गेली होती. शोध सुरू होता. मात्र काही वेळातच या तरुणीचा शोध लागला. मात्र तिचा मृतदेह सापडल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

पोलिसांनी सांगितले की, अन्नपूर्णचा विवाह मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार होता. मृत तरुणीच्या भावाने सांगितले की, एका दिवसापूर्वी अन्नपूर्ण टेलरला कपडे देण्यासाठी मौहार गावात जाते असे सांगून ती गेली होती. मात्र खूप वेळ झाल्यावर ती ट्रेनमध्ये असल्याचे समजले. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लग्न असल्याने तयारी जोरात सुरू होती. मृत तरुणीचा साखरपुडा वर्षभरापूर्वी ठरला होता. मात्र कोरोना कोरोनामुळे हा विवाह पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता विवाह तोंडावर आला असताना तिनं हे टोकाचं पाऊल का उचललं हे समजू शकलेलं नाही.

दरम्यान, सीएसपी योगेश साहू यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले. मिळत असलेल्या माहितीवरून तिने धावत्या ट्रेनमधून उडी मारली असावी, असे दिसते. तसेच त्यामुळे गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला असावा. आता पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आणि पुढील तपासानंतर नेमकं कारण समोर येईल असं पोलिसांनी सांगितलं. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगडmarriageलग्नrailwayरेल्वे