Crime News: सात वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
By नितिन गव्हाळे | Updated: September 20, 2022 14:05 IST2022-09-20T14:05:16+5:302022-09-20T14:05:47+5:30
Crime News: घराजवळ राहणाऱ्या ७ वर्षीय मुलाला बोलावून एका खोलीमध्ये नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली.

Crime News: सात वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार, अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
- नितीन गव्हाळे
अकोला - घराजवळ राहणाऱ्या ७ वर्षीय मुलाला बोलावून एका खोलीमध्ये नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणात सिव्हील लाइन पोलिसांनी आंबेडकर नगरातील १७ वर्षीय मुलाविरूद्ध मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल केला.
मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या घरालगत १७ वर्षीय मुलगा आई व भावासोबत राहतो. तिचा मोठा मुलगा(७) हा घराबाहेर खेळण्यासाठी गेला होता. सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेजारच्या घरातून मुलाच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे मुलाच्या आईने तिकडे धाव घेतली असता, घरातील एका खोलीचा दरवाजा बंद होता. परंतु दरवाजा तुटलेला असल्यामुळे त्यातून पाहिले असता, आरोपी मुलगा हा चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करीत असल्याचे दिसून आले. आरोपीला मुलाला साेडण्यास सांगितले असता, त्याने मुलाला सोडून दिले. मुलगा आईकडे धावत आला आणि आरोपीने त्याच्यासोबत केलेले विकृत कृत्य कथन केले. आईच्या तक्रारीनुसार सिव्हील लाइन पोलिसांनी आरोपी १७ वर्षीय मुलाविरूद्ध भादंवि कलम ३७७, सहकलम पोस्को ॲक्ट ३, ४ नुसार दाखल केला.