शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: लैंगिक छळाच्या बनावट तक्रारीच्या नावे विद्यापीठात लाखोंची खंडणी वसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 07:23 IST

Crime News: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांकडून लैंगिक छळाच्या बनावट तक्रारींची भीती दाखवून लाखोंची खंडणी वसूल केल्याचा प्रकार उजेडात आला.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील सात उच्चपदस्थ विभागप्रमुखांकडून लैंगिक छळाच्या बनावट तक्रारींची भीती दाखवून लाखोंची खंडणी वसूल केल्याचा प्रकार उजेडात आला. तक्रारींची शहानिशा करण्याच्या समितीवर असून त्यातून वाचवू, असे सांगून जनसंवाद विभागातील सहायक प्राध्यापक व जनसंपर्क अधिकारी धर्मेश धवनकर यांनी खंडणी वसुली केल्याचा आरोप असून तशी सामूहिक तक्रार कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी तसेच राज्यपाल व उच्च शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

सातही तक्रारकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना अधिक तपशील दिले असून, पोलिसांकडे जाण्याचीही तयारी ठेवली आहे. विद्यार्थिनींनी तुमच्याविराेधात लैंगिक छळाची तक्रार केली असून विद्यापीठाने चाैकशी समिती गठित केली आहे. विद्यापीठाचा लीगल सेल व तथ्यशोध समितीवर नियुक्त वकिलांना पैसा दिल्याशिवाय हे मिटणार नाही. त्यासाठी पैसा द्या, असे सांगून धर्मेश धवनकर यांनी लाखाे रुपये वसूल केले, असा आरोप आहे. परंतु विद्यापीठाने कसलीही समिती गठित केली नसल्याची शहानिशा झाल्यानंतर सर्वांनी एकत्रित तक्रार केली.

यासंदर्भात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी हे प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत, तर धवनकर यांनी आपल्याला काही माहिती नसल्याचे म्हटले आहे. 

या विभागप्रमुखांची झाली फसवणूकपुरातत्त्व तसेच प्रवास व पर्यटन विभागाचे प्रमुख डाॅ. प्रियदर्शी खाेब्रागडे, लाेकप्रशासन विभागाचे प्रमुख डाॅ. जितेंद्र वासनिक, समाजशास्त्र विभागप्रमुख डाॅ. अशाेक बाेरकर, ग्रंथालयशास्त्र विभागप्रमुख डाॅ. सत्यप्रकाश निकाेसे, अर्थशास्त्र विभागप्रमुख डाॅ. सत्यप्रिय इंदूरवाडे, जीवरसायन विभागप्रमुख डाॅ. वीरेंद्र मेश्राम, डाॅ. आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रभारी विभागप्रमुख डाॅ. शैलेंद्र लेंडे यांची फसवणूक झाली. त्यांच्याकडून ३ ते ७ लाख अशी रक्कम उकळण्यात आली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर