Crime News: Yavatmalमध्ये पूर्ववैमनस्यातून दोघांची हत्या, शस्राने भोसकले, मरेपर्यंत मारले 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 06:46 AM2021-10-13T06:46:14+5:302021-10-13T06:46:33+5:30

Crime News: यवतमाळ शहरातील आर्णी रोड मार्गावर जुन्या वादातून दोघांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली.

Crime News: Two Murder in Yavatmal | Crime News: Yavatmalमध्ये पूर्ववैमनस्यातून दोघांची हत्या, शस्राने भोसकले, मरेपर्यंत मारले 

Crime News: Yavatmalमध्ये पूर्ववैमनस्यातून दोघांची हत्या, शस्राने भोसकले, मरेपर्यंत मारले 

Next

यवतमाळ - शहरातील आर्णी रोड मार्गावर जुन्या वादातून दोघांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना 10.45  वाजता घडली. दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या वसीम पठान व त्याचा सहकारी उमेश येरमे दोघेही  रा. नेताजी नगर यांच्यावर अज्ञात टोळक्याने हल्ला केला. दोघांनाही जागेवरच गतप्राण होईपर्यंत मारहाण करण्यात आली. नवरात्र उत्सवाच्या काळात शहरात भाविकांची गजबज असताना हे हत्याकांड घडले. त्यामुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. अवधूत वाडी चे ठाणेदार मनोज केदारे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. आहेत मृतकांची आणखी ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Crime News: Two Murder in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.