शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; पत्नी आणि मुलांची विष पाजून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 09:11 IST

Crime News : हुंड्यासाठी पती हैवान झाला आहे. पत्नी आणि दोन मुलांना विष पाजून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नवी दिल्ली - बिहारमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. हुंड्यासाठी पती हैवान झाला आहे. पत्नी आणि दोन मुलांना विष पाजून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिहारमधील नालंदा येथील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गुड्डू पासवान असं फरार आरोपीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत चकियापार गावात गुड्डू पासवान आपल्या कुटुंबासोबत राहतो. 2015 मध्ये त्याचं लग्न झालं होतं. त्याला तीन वर्षाचा मुलगा आणि एक वर्षाची मुलगी अशी दोन मुले आहेत. गुड्डू आणि त्याच्या पत्नीमध्ये हुंड्यावरुन दररोज वाद होत होते. हुंड्य़ासाठी सासरची मंडळी तिच्यावर दबाव टाकत होते. तिचा शारीरीक आणि मानसिक छळ केला जात होता. याच दरम्यान गुड्डूने टोकाचं पाऊल उचललं आणि आपल्या पत्नी व मुलांना संपवण्याचा मोठा निर्णय घेतला. 

पत्नीला आणि दोन लहान मुलांना पाजलं विष 

गुड्डूने आपल्या पत्नीला आणि दोन लहान निष्पाप मुलांना विष पाजले. यात त्या तिघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पीडितेच्या सासूला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिची चौकशी पोलीस करीत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर हुंड्यासाठी महिलेला प्रचंड त्रास दिला गेला. महिलेला माहेराहून पैसे आणण्यासाठी सांगितले जात होते. याच दरम्यान तिला दोन मुलं झाली. पण मुलं झाल्यानंतर देखील तिला त्रास देण्यात आला आणि वारंवार हुंड्याची मागणी करण्यात आली. 

सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल 

विष प्याजल्य़ामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर दोन मुलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलीस अनेकांची चौकशी करत आहेत. घटनेनंतर पीडिताच्या कुटुंबीयांनी सासरच्या आठ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हुंड्याची मागणी करीत हत्या केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBiharबिहार