शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: थरकाप उडवणारी घटना, रंग खेळल्यानंतर बाथरूमध्ये आंघोळीसाठी गेलेल्या जोडप्याचा गुदमरून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 19:58 IST

Crime News: हरियाणामधील करनाल येथे एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. करनालमधील घरौंडा येथे एका जोडप्याचा बाथरूममध्ये श्वास गुदमरून मृत्यू झाला. मृत गौवर आणि शिल्पी यांचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.

करनाल (हरियाणा) - हरियाणामधील करनाल येथे एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. करनालमधील घरौंडा येथे एका जोडप्याचा बाथरूममध्ये श्वास गुदमरून मृत्यू झाला. मृत गौवर आणि शिल्पी यांचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. शुक्रवारी होळी खेळल्यानंतर हे दोघेही बाथरूमध्ये गेले. तिथे गॅस लिक झाल्याने ही दुर्घटना घडली. रात्री उशिरा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृतांचे कुटुंबीय असलेल्या योगेश कुमार यांनी सांगितले की, माझा चुलत भाऊ बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत पडला आहे, असा फोन मला आला. त्यांनंतर गावातील डॉक्टरकडे तपासून घेतले. मग पानिपतच्या खासगी रुग्णालयात नेले. तिथे त्यांना दाखल करून घेण्यात आले नाही. त्यानंतर आम्ही घरौंडाच्या सरकारी रुग्णालयात घेऊन गेलो, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार या बाथरूममध्ये गॅसवरील गिझर लागलेला होता. होळी साजरी केल्यानंतर हे दोघेही बाथरूममध्ये हातपाय धूत होते. तिथे असलेल्या गिझरमुळे त्यांचा श्वास कोंडला गेला. पाण्याची मोटार बराच वेळ बंद झाली नाही, तेव्हा आई त्यांना पाहायला गेली. तेव्हा हे दोघेही बेशुद्धावस्थेत पडलेले होते.

दरम्यान, पोलीस अधिकारी दीपक कुमार यांनी सांगितले की, गौरव आणि शिल्पी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती. कुटुंबातील लोकांनी सांगितले की, बाथरुममध्ये गॅस गिझर लावलेला होता. त्यातून गॅस लिक होऊन ही दुर्घटना घडली. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणा